• Download App
    दिल्ली : आझादपूरमधील आशियातील सर्वात मोठ्या भाजी मंडईत लागली भीषण आग Delhi A major fire broke out in Asias largest vegetable market in Azadpur

    दिल्ली : आझादपूरमधील आशियातील सर्वात मोठ्या भाजी मंडईत लागली भीषण आग

    अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील आझादपूर या आशियातील सर्वात मोठ्या घाऊक भाजी मंडईमध्ये आज सायंकाळी भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले. सुदैवाने या घटनेत अद्यापपर्यंत तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Delhi A major fire broke out in Asias largest vegetable market in Azadpur

    घटनास्थळी मार्केटच्या शेडला भीषण आग लागली आणि त्यातून आगीच्या ज्वाळा उठताना दिसत होत्या.अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, आगीची माहिती सायंकाळी 5.20 वाजता मिळाली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर आग  आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले.

    Pakistan Bomb Blast : बॉम्बस्फोटांनी हादरले पाकिस्तान, काही तासांतच दोन आत्मघातकी हल्ल्यात ६० ठार

    टोमॅटो विक्रेत्याच्या दुकानामागील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ही आग लागली आणि ती पसरल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भाजी मंडईत आग लागल्यानंतर  एकच धावपळ उडाली होती.

    Delhi A major fire broke out in Asias largest vegetable market in Azadpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!