• Download App
    विधानसभा अध्यक्षांशी ठाकरे गटाचा अपात्रतेचा झगडा; तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नव्या चिन्हांचा शोध!! Both factions of NCP are searching for new symbols

    विधानसभा अध्यक्षांशी ठाकरे गटाचा अपात्रतेचा झगडा; तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नव्या चिन्हांचा शोध!!

    प्रतिनिधी

    मुंबई :  एकीकडे शिंदे गटातले 16 आमदार अपात्र करण्यासाठी ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांशी झगडा करतो आहे. तो झगडा विधिमंडळात करण्याबरोबरच ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टातही पोहोचविला आहे. Both factions of NCP are searching for new symbols

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मात्र फूट पडल्यानंतर देखील दोन्ही गट अद्याप शिवसेनेतल्या संघर्षासारखी भूमिका घेत नसून शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ गटांनी राष्ट्रवादीचे मूळ चिन्ह घड्याळ हे गोठवले जाईल हे लक्षात घेऊन शांतपणे नव्या चिन्हाचा शोध सुरू केला आहे.

    शिवसेना अधिकृतरित्या फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मूळ चिन्ह धनुष्यबाण सुरुवातीला गोठविले होते. नंतर ते शिंदे गटाला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दिले. दरम्यानच्या काळात ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार ही चिन्हे निवडणूक आयोगाने दिली होती. तशीच राष्ट्रवादीच्या फुटीबाबत निवडणूक आयोग भूमिका घेण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे मूळ चिन्ह घड्याळ गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह देण्याची शक्यता आहे.



    राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गेले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या चार चिन्हांवर निवडणुका लढवून जिंकून आलो आहोत असे शरद पवारांनी सांगितले आहेच. अजित पवार मात्र हाताचा पंजा आणि त्यानंतर घड्याळ या दोनच चिन्हांवर निवडणूक लढले आहेत.

    येत्या 6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.

    अजित पवार गटाचा राष्ट्रवादीच्या 53 आमदारांवर दावा

    निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबरपासून राष्ट्रवादीवर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने त्यांच्याकडे विधानसभेतले 53 पैकी 43 तर विधानपरिषदेतले 9 पैकी 6 आमदार असल्याचा दावा केलाय. तर, दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदाराना अपात्र करण्याची  मागणी शरद पवार गटाने केली आहे.

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नेमके कोणती चिन्हे मिळणार याची उत्सुकता आहे.

    Both factions of NCP are searching for new symbols

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस