• Download App
    पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीत घट, मात्र अद्यापही विविध तळांवर मोठ्या संख्येने दहशतवादी|Decline in infiltration from Pakistan, but still large numbers of terrorists at various bases

    पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीत घट, मात्र अद्यापही विविध तळांवर मोठ्या संख्येने दहशतवादी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांत लक्षणीय घट झाली असली, तरी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) विविध तळांवर मोठ्या संख्येने दहशतवादी आहेत, अशी माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली.Decline in infiltration from Pakistan, but still large numbers of terrorists at various bases

    पाकिस्तानला लागू असलेली नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि नितीश प्रमाणिक यांनी लेखी उत्तर दिले. घुसखोरी आणि ड्रोनचा वापर करून शस्त्रे व स्फोटके टाकण्याच्या घटना रोखण्यासाठी सरकारने योजलेल्या उपायांचीही त्यांनी तपशीलवार माहिती दिली.



    जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ पासून नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरीच्या घटना खूपच कमी झाल्या आहेत. २०२१ मध्ये घुसखोरीच्या ३४ घटना घडल्या, तर २०१८ मध्ये १४३, २०१९ मध्ये १३८ आणि २०२० मध्ये घुसखोरीच्या ५१ घटना घडल्या, असे राय यांनी सांगितले. गेल्या एक वषार्पासून भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेवर शस्त्रबंदीचे पालन करीत आहे.

    मात्र, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये विविध तळांवर मोठ्या संख्येने दहशतवादी ठाण मांडून आहेत. सरकार नियमितपणे नियंत्रण रेषेवरील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत असते आणि दहशतवाद्यांच्या अन्य घटकांचे डाव उधळून लावण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करीत असते, असे प्रमाणिक यांनी सांगितले.

    तथापि, मागण्यात आलेली माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असून राष्ट्रीय सुरक्षेच्या हितार्थही ती देता येऊ शकत नाही. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, २००८ पासून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादाला आर्थिक रसद पुरविण्याशी संबंधित १०३ प्रकरणे नोंदविले असून ७८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ९२ प्रकरणात ८६५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापैकी १८ प्रकरणात ९७ जणांना दोषीसिद्ध ठरविण्यात आले आहे.

    Decline in infiltration from Pakistan, but still large numbers of terrorists at various bases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध