• Download App
    ओमायक्रोनचा धोका : लसीकरणाचा वेग कमी, संपूर्ण भारताचे लसीकरण कधी करणार?; राहुल गांधींचा मोदी सरकारला खडा सवाल । Danger of omecron: Vaccination slows down, when will the whole of India be vaccinated ?; Rahul Gandhi's tough question to Modi government

    ओमायक्रोनचा धोका : लसीकरणाचा वेग कमी, संपूर्ण भारताचे लसीकरण कधी करणार?; राहुल गांधींचा मोदी सरकारला खडा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार म्हणतेय, कोरोनाचा व्हेरीएंट ओमायक्रोनचा धोका वाढतो आहे आणि दुसरीकडे सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यात खूपच कमी पडते आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 60 % नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु महिना अखेरीला आठ दिवस शिल्लक राहिले असताना फक्त 40% नागरिकांचे देखील लसीकरण पूर्ण झालेले नाही. सरकार बुस्टर ङोस कधी देणार?, असा खडा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केला आहे. Danger of omecron: Vaccination slows down, when will the whole of India be vaccinated ?; Rahul Gandhi’s tough question to Modi government

    राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मधून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार म्हणते आहे की, ओमायक्रोनचा धोका वाढतो आहे. कोरूना प्रतिबंधक लसीकरणाचे डिसेंबर 2021 पर्यंतचे टार्गेट 60 % नागरिकांचे पूर्ण लसीकरण असे ठेवण्यात आले होते. परंतु सध्याच्या लसीकरणाचा दर बघितला तर 40% नागरिकांचेही लसीकरण पूर्ण झालेले नाही. डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत सुमारे 42 % नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. याचा अर्थ 18% डेफिसिट आहे. सरकार लसीकरण पूर्ण कधी करणार? आणि त्यानंतर बूस्टर डोस कधी देणार?, असा सवाल राहुल गांधींनी या ट्विट मधून केला आहे.

    यासाठी त्यांनी टीव्हीच्या एनडीटीव्हीच्या बातमीचा आधार घेतला आहे. एनडीटीव्हीने सध्याचा लसीकरणाचा देशातला सरासरी दर लक्षात घेऊन 42 % नागरिकांचे लसीकरण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते, असे म्हटले आहे.

    Danger of omecron : Vaccination slows down, when will the whole of India be vaccinated ?; Rahul Gandhi’s tough question to Modi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका