• Download App
    देशवासीयांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस; मोदींच्या निर्णयावर राहुल गांधी खुश!! Corona preventive booster dose to countrymen

    देशवासीयांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस; मोदींच्या निर्णयावर राहुल गांधी खुश!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशवासीयांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी खूश झाले आहेत. त्यांनी ट्विट करून मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. Corona preventive booster dose to countrymen

    केंद्र सरकारने माझा सल्ला मान्य केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ते कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देणार आहेत. हा अतिशय योग्य निर्णय आहे, अशा शब्दात मध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. 22 डिसेंबर रोजी राहुल गांधींनी ट्विट करून देशातली बहुसंख्य जनतेचे अजून लसीकरण पूर्ण झालेले नाही. केंद्र सरकार बुस्टर डोस कधी देणार?, असा सवाल केला होता.

    त्यानंतर काल अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी रात्री अचानक देशाला संबोधित करून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. आज सकाळी राहुल गांधी यांनी या घोषणेचे स्वागत केले. केंद्र सरकारने माझा सल्ला मानला आहे. बूस्टर डोस देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. हा अतिशय योग्य निर्णय आहे, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    Corona preventive booster dose to countrymen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!

    आव्हान ठरणाऱ्या नेत्यांना “गायब” करण्याची परंपरा; उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा!!

    लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी बृजभूषण यांची याचिका फेटाळली; खासदारांनी पुन्हा चौकशीची केली होती मागणी, 7 मे रोजी आरोप निश्चिती