• Download App
    कथित रनर अप फॉर्म्युल्यात काँग्रेस गाळात; फक्त 261 जागा लढविण्याचा आकडा येतोय गळ्यात!! Congress will be the big loser if I.N.D.I.A applied runner up formula

    कथित रनर अप फॉर्म्युल्यात काँग्रेस गाळात; फक्त 261 जागा लढविण्याचा आकडा येतोय गळ्यात!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी “इंडिया” आघाडीच्या बैठकीला मराठी पक्वान खाऊन जोर चढला असला, तरी लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याच्या नादाला लागलेल्या आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष काँग्रेसच गाळातच जाण्याची चिन्हे आहेत. Congress will be the big loser if I.N.D.I.A applied runner up formula

    कारण या आघाडीतल्या नेत्यांचा “रनर अप फॉर्म्युला” राबविण्याचा जो मनसुबा आहे, तो प्रत्यक्षात फलद्रूप झाला, तर सर्वात मोठा त्याग काँग्रेसला करावा लागून काँग्रेसच्या वाट्याला फक्त 261 जागा लढवण्यासाठी गळ्यात पडणार आहेत. हा आकडा लोकसभेच्या बहुमता इतका देखील म्हणजे 272 चा नाही. आत्तापर्यंत काँग्रेसने सर्वात कमी 421 जागा लढविल्या आहेत, पण आता इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा रनर फॉर्म्युला राबवण्याचा फार आग्रह झाला, तर त्याचा सर्वाधिक तोटा काँग्रेसलाच भोगावा लागणार आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचे वाटप करण्याचा “इंडिया” आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. 2019 चे निवडणूक निकाल हा निकष ठरवून हा रनर अप फॉर्म्युला समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    काय आहे रनर अप फॉर्म्युला?

    या फॉर्म्युल्यानुसार 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर तेच राजकीय पक्ष पुन्हा निवडणूक लढतील. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार, ती जागा तर त्या पक्षाला मिळेलच, पण ज्या जागांवर गेल्यावेळी ज्या राजकीय पक्षाला दुस-या क्रमांकाची मते मिळाली असतील, ती जागाही तोच पक्ष लढवेल. या रनर अप फॉर्म्युल्यावर इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत विचारविनिमय होणार आहे. त्यानंतर या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. हा “रनर अप फॉर्म्युला” लागू केला, तर कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळू शकतात हे देखील विचारात घेण्यात आले आहे.


    Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणातील “हत्या”, “देशद्रोही” “गद्दार”, “मारा गया” हे असंसदीय शब्द लोकसभेतील रेकॉर्ड मधून हटविले!!


    2019 मध्ये काँग्रेसचे 422 उमेदवार रिंगणात होते. 19.7 % मतांसह काँग्रेसचे  52 खासदार विजयी झाले. 209 जागांवर काँग्रेस उमेदवारांना दुस-या क्रमांकाची मते मिळाली. रनर अप फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसच्या वाट्याला 261 जागा मिळतील.

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 41 जागा मिळतील. उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीला 36 जागा मिळतील. मात्र, हा फॉर्म्युला काही राज्यांमध्ये धक्कादायक ठरणार आहे. कारण बिहारमध्ये 16 खासदार असलेल्या नीतीश कुमारांच्या जेडीयूला 17 जागाच लढवता येतील, तर एकही खासदार नसलेल्या लालू यादवांच्या आरजेडीला 19 जागांवर उमेदवार उभे करता येतील.

    रनर अप फॉर्म्युल्याचे महाराष्ट्रातले चित्र

    गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, तर 3 जागी शिवसेना उमेदवार दुस-या स्थानी होते.  राष्ट्रवादीचे 4 खासदार विजयी झाले, तर 15 जागी राष्ट्रवादी उमेदवार दुस-या जागी होते. याचाच अर्थ शिवसेनेच्या वाट्याला 21, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 19 जागा येतील.  सध्या राज्यात केवळ एकच खासदार असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ 8 जागा येतील.

    हा रनर अप फॉर्म्युला अनेक राजकीय पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर, काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष तसंच पीडीपीसारख्या काही राजकीय पक्षांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारख्या बड्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फारच कमी जागा येतील. त्यामुळे जागावाटपाचा हा फॉर्म्युला सगळ्यांनाच मान्य होईल का??, हा सर्वांत कळीचा मुद्दा ठरेल.

    Congress will be the big loser if I.N.D.I.A applied runner up formula

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य