विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीतल्या अनपेक्षित धक्कादायक पराभवानंतर काँग्रेस सैरभैर झाली आहे. पक्षातल्या नेत्यांचे मनोधैर्य पुन्हा ढेपाळले असून प्रसार माध्यमांकडे पराभवाची कारणमीमांसा कशी करायची??, याविषयी पूर्ण संभ्रम तयार झाला आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी सुरवातीला EVM वर खापर फोडून पाहिले. पण ते पचले नसल्याचे पाहताच त्या मुद्द्यावर बोलायचे थांबविले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी बैठक घेतली पण तिला हरियाणातल्या नेत्यांनाच बोलवले नाही. Congress review meeting on Haryana election results
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्याच एका नेत्याने हरियाणातल्या पराभवाबद्दल पक्षनेत्यांना घरचा आहेर देणारे वक्तव्य केले.
मूळात काँग्रेस ही केडर बेस पार्टी उरलेली नाही. तिच्यात नेतेच जास्त झालेत. त्यामुळे काँग्रेस मध्ये इतर केडर बेस पार्टीपेक्षा गटबाजी जास्त आहे. यात काही नवीन नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे दिल्लीतले माजी खासदार संदीप दीक्षित यांनी हरियाणातल्या पराभवाची वस्तुस्थिती मांडली.
संदीप दीक्षित म्हणाले :
– काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. हे काही नवीन नाही. कारण केडर बेस पक्षांच्या तुलनेत, काँग्रेसमध्ये नैसर्गिक नेतृत्व आहे. म्हणजे नेते अधिक झालेत. काँग्रेस आता केडर बेस पार्टी उरलेली नाही. पक्षात पद मिळवण्यासाठी किंवा आपापल्या लोकांना तिकीट मिळवून देण्यासाठी थोडीशी भांडणे होतात.
कुठलीही निवडणूक आली तरी तिथे काँग्रेस पक्षातले सर्वजण 100% एकत्र आले आहेत, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नसते. पण जर आपण अशांना तिकीट देऊ लागलो जे कदाचित पात्र नाहीत किंवा जिंकू शकत नाहीत, तर पक्षाचे नुकसान होईल.
– जेव्हा मार्जिन कमी होते तेव्हा मी स्वतः अधिकारी पाहिले आहे की ते तसे करू शकतात आणि ते असे करू शकतात एक्झिट पोलवर विश्वास ठेवा, पण त्यात काही सत्य आहे.
Congress review meeting on Haryana election results
महत्वाच्या बातम्या
- महायुती सरकारचे विक्रमी 80 निर्णय; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 वरून 15 लाख, पत्रकारांसाठी महामंडळाची घोषणा
- Cocaine : स्नॅक्सच्या पॅकेटमध्ये आढळले तब्बल 2000 कोटींचे कोकेन!
- Radhaswami maharaj राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!
- Himanta Biswa Sarma : हरियाणातील काँग्रेसच्या पराभवावर हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला टोला, म्हणाले…