वृत्तसंस्था
चंडीगड – कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते चरणजितसिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले राज्याचे ते पहिले दलित मुख्यमंत्री आहेत. सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सोनी हे दोघे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. पंजाब विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सामाजिक समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.congress plays dalit card in Punjab
कॉंग्रेसने या निवडी करून जातीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. रंधावा यांच्या रूपाने जाट शिख तर सोनी यांच्या माध्यमातून हिंदू चेहरा देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. चन्नी यांच्या माध्यमातून राज्यातील ३२ टक्के दलित लोकसंख्येला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.
दोआब प्रांतात हिंदू आणि शीख यांचे वर्चस्व असल्याने या दोन घटकांच्या नेत्यांनाही मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे.चन्नी हे रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात ते येथून सलग तीनवेळी निवडून आले आहेत.
रंधावा देखील सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकले असून ते गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक मतदारसंघाचे नेतृत्व करतात. सोनी अमृतसर येथील पाचवेळा विजयी झाले आहेत.कॉंग्रेसच्या या निवडीने भाजप, आप आणि बसप या अन्य पक्षांची थोडी अडचण झाल्याचे मान जाते. बसप नेत्या मायावती यांनी पंजाबर खास लक्ष देण्याचे जाहीर केले होते.
त्यांनी या निवडीवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यानेच काँग्रेसने दलित नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा स्टंट केला आहे. काँग्रेसला आजही दलितांवर विश्वाुस नाही, त्यामुळे त्यांच्या दुटप्पीपणाबाबत दलितांनी सावध राहावे. राज्यातील दलित या देखाव्याला भुलणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.
भाजप नेते दुष्यंतकुमार गौतम म्हणाले केवळ दलित मते मिळावीत म्हणूनच काँग्रेसने चन्नी यांना मुख्यमंत्री केले आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने पुढील निवडणुकीसाठी चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे.
congress plays dalit card in Punjab
महत्त्वाच्या बातम्या
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता