वृत्तसंस्था
नवी दिल्ली :काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस नेत्यांनी आपले नाव लागावे, यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. त्या मध्ये सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य राज्यातील नेत्यांचा समावेश आहे.Congress leaders has begun lobbying for the lone Rajya Sabha seat from Maharashtra, Pradnya Saatav , pruthviraj chavhan and many name’s
राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आता ४ ऑक्टोंबरला राज्यसभेची निवडणूक होत आहे. या जागेवर आपली वर्णी लागावी, यासाठी काँग्रेसच्या अनेकांनी प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, गुलाम नबी आझाद, राजीव शुक्ला, संजय निरुपम, अनंत गाडगीळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी आता पक्षश्रेष्टीकडे लॉबिंग सुरु केले आहे.
राज्यसभा खासदार पदावर तर पहिला हक्क हा प्रज्ञा सातव यांचा आहे. कारण त्या राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. त्यानंतर अन्य नेत्यांचा नंबर लागतो. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. परंतु ते सध्या आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकार असल्याने काँग्रेस एक घटक पक्ष असल्याने त्यांना पुन्हा केंद्रात पाठविणे म्हणजे पुन्हा महाराष्ट्रात आमदारकीची निवडणूक घेणे अयोग्यच आहे.
खरे तर त्यांना महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी खास दिल्लीतून महाराष्ट्रात आणले, मुख्यमंत्री केले. लोकसभा म्हणा किंवा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पत ढासळली. म्हणावी तशी प्रगती ते मुख्यमंत्री असताना करू शकले नाहीत. लोकसभेत काँग्रेसचा तर पूर्णच पराभव झाला. विधानसभेतज्येष्ठ नेते म्हणून ते काही काही चमत्कार दाखवू शकलेले नाहीत.
मात्र अधून- मधून मोदी- भाजप पुन्हा निवडून आले तर देशात हुकूमशाही येईल, अशी गर्जना ते करतात. मोदी येऊन सात वर्षे झाली असून देशात नित्यनियमाने निवडणुका होत आहेत. अगदी कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सुद्धा निवडणूक लोकशाही पद्धतीनेच आणि कोरोनाच्या काळातच पार पडली. विधानसभा, लोकसभा आणि कारखाना निवडणुकीत त्यांची चमकदार कामगिरी काही लोकांना दिसली नाही. भाजपला शिव्या- शाप घालून सुद्धा तेथे सुरेश भोसले आणि अतुल भोसले या भाजप नेत्यांचीच राजवट आली आहे.
हाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यामुळे मोदी आले की हिटलरशाही आली. या त्यांच्या टीकेत आता दम उरलेला नाही. सध्या ते आमदार आहेत. केवळ मोदींवर टीका करतात म्हणून आणि केवळ काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवयाचे का ? याचा निर्णय अर्थात काँग्रेसच घेणार आहे.
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील दोन मोठे नेते म्हणजेच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकाच वेळी राज्यसभेत दिसणे म्हणजे एकप्रकारे विदर्भावर अन्याय होण्यासारखे आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आहेत. त्यामुळे एकाच वेळी एकाच जिल्ह्यातुन तीन खासदार दिसणे बरोबरही दिसत नाही.
आता राहीला प्रश्न पुण्याचे अनंत गाडगीळ यांचा. गाडगीळ हे आजोबा काकासाहेब गाडगीळ आणि विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पुण्याईवर खासदारकीचा आग्रह धरत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना पूर्व पुण्याईच्या जोरावर तिकीट मिळाले नाही. मोहन जोशी यांना तिकीट मिळाले. तेव्हा दिले नाही तर आता राज्यसभेचे तरी द्या, असा त्यांचा आग्रह आहे.
परंतु पुण्यावरील गाडगीळ घराण्याची राजकीय ताकद लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रे दरम्यान नाहीशी झाली. विठ्ठलराव गाडगीळ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि दिल्लीतील गाडगीळ यांचा दबदबा संपुष्टात आला. गुलामनबी आझाद हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. काँग्रेस श्रेष्टींवर टीका करण्यात ते आघाडीवर होते. त्यामुळे त्यांना पुन्हा कितपत संधी मिळते, हे लवकरच कळेल.
Congress leaders has begun lobbying for the lone Rajya Sabha seat from Maharashtra, Pradnya Saatav , pruthviraj chavhan and many name’s
महत्त्वाच्या बातम्या
- वाचा… विजय रूपाणींच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी, भाजपच्या ‘विजय’ मोहिमेत अनफिट ठरले रूपाणी
- डुप्लीकेट सिमबाबत वोडाफोन आयडियावर समस्या, कंपनीला आपल्या ग्राहकाला द्यावे लागतील 28 लाख , जाणून घ्या संपूर्ण प्रकरणसंपूर्ण प्रकरण
- Vijay Rupani Resigns : विजय रुपाणींचा राजीनामा, आता गुजरात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर
- कर्नाटक, उत्तराखंड नंतर गुजरातेतही फिरवली भाकरी…. विजय रूपाणींच्या राजीनाम्यापूर्वीपासूनच ‘टीम गुजरात’मध्ये सुरू झाली होती खांदेपालट