नाशिक : पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 27 हिंदूंचे शिरकाण केल्यानंतर सगळा देश पाकिस्तान विरुद्ध खवळला. देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड आग भडकली, पण काही नेत्यांना त्यांच्यातल्या “धर्मनिरपेक्षतेने” स्वस्थ बसू दिले नाही म्हणून त्यांनी पाकिस्तान धार्जिणी वक्तव्ये केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि महाराष्ट्रातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वाट्टेल त्या फाका मारल्या. पाकिस्तानची युद्ध करू नका, असे सिद्धरामय्या म्हणाले, तर दहशतवाद्यांना धर्म विचारून गोळ्या घालायला वेळ तरी होता का??, असा अचरट सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. या तिन्ही नेत्यांविरोधात सोशल मीडियातून संताप बाहेर आला, पण त्याची झळ राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेसला अधिक बसली. Pahalgam attack
त्याबरोबर सुधारलेल्या काँग्रेस नेत्यांनी आपल्याच नेत्यांच्या फाका मारलेल्या वक्तव्यांपासून पक्षाचे हात झटकून टाकले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विट करून काँग्रेसच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांशी पक्षाचा काही संबंध नसल्याचा खुलासा केला. पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसची भूमिका मांडली. सध्याच्या संकटग्रस्त परिस्थितीत सरकार जो काही निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठाम उभा राहील असे आश्वासन या दोन्ही नेत्यांनी दिले. हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे बाकी कुठलेही नेते काहीही बोलत असले तरी त्यांच्या वक्तव्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे जयराम रमेश यांनी x अकाउंट वर लिहिले.
– सोनिया + राहुल गांधींच्या संशयास्पद हालचाली
पण याच दरम्यान काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून संशयास्पद कृती घडल्याचे समोर आले. जगभरातल्या डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल नावाच्या संस्थेचे प्रतिनिधी आज 10 जनपथ वर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवण्याची तयारी करत असताना त्याच बरोबर पाकिस्तान त्याच बरोबर पाकिस्तान विरोधात संपूर्ण देशात संताप उसळला असताना नेमके पॉलिटिकल टायमिंग साधून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनलच्या सदस्यांची भेट घेतली. भारतातल्या काही डाव्या संघटना या प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनलच्या सदस्य आहेत. यामध्ये मेधा पाटकर, अरुणा रॉय, सुनीती र. र. वगैरेंचा समावेश आहे. यांचे शहरी नक्षलवाद्यांशी निकटचे संबंध असल्याचा संशय आहे. अशा प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनलच्या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नेमकी आजच भेट घेतल्याने या दोन्ही नेत्यांच्या राजकीय हालचालींविषयी संशय निर्माण झाला आहे.
त्याचवेळी दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी देखील समोर आली असून त्यामुळे तर राहुल गांधींच्या एकूण राजकीय भूमिकेविषयीच गडद संशय निर्माण झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार राहुल गांधींनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याच्याशी फोनवरून बातचीत केल्याची ही बातमी आहे. अर्थातच या बातमीचे कोणीही कन्फर्मेशन केलेले नाही, पण या बातमीने संशयाची दाट पेरणी मात्र करून ठेवली आहे.
त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या वक्तव्यावरून जरी आपले हात झटकून आपण पाक असल्याचे दाखवून दिले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या दोन अति वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचालीतून जो संशय निर्माण झाला आहे, त्यावर मात्र पक्षातून कुणीही खुलासा द्यायला बाहेर आलेले नाही. ही बाब सर्वाधिक गंभीर आहे.
Congress desist itself from controversial remarks by leaders, but…
महत्वाच्या बातम्या
- Pahalgam attack case पहलगाम हल्ल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट; अतिरेक्यांनी लोकल हँडलरसह ड्रोनने केली रेकी; पुलवामाकडे पळाले
- Gulabrao Patil आपत्तीत सगळ्यात आधी पोहोचले त्या एकनाथ शिंदेंना बदनाम करता? गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटाला सवाल
- Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हिंसाचाराच्या समर्थनार्थ व्हाट्सअॅप स्टेटस पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक
- ED office : मुंबईतील ED कार्यालयास भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी