• Download App
    काँग्रेसचा संसदेत गोंधळ; बाहेर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे होमवर्क; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी भेट । Congress chaos in Parliament; Outside Captain Amarinder Singh's homework; Meeting with the Chief Minister of Haryana

    काँग्रेसचा संसदेत गोंधळ; बाहेर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे होमवर्क; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी भेट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकार एक पाऊल मागे घेत तीनही कृषी कायदे मागे घेत असताना काँग्रेससह सर्व विरोधक संसदेत आणि संसदेबाहेर गदारोळ करण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे आपल्या पंजाब ब्लॉक काँग्रेस साठी होमवर्क करण्यात निमग्न आहेत. Congress chaos in Parliament; Outside Captain Amarinder Singh’s homework; Meeting with the Chief Minister of Haryana



    काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार गोंधळ घातला असताना तसेच केंद्र सरकार चर्चेतून पळ काढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला असताना कॅप्टन अमरिंदरसिंग मात्र या गदारोळात पासून दूर राहत आपल्या पंजाब लोक काँग्रेस या पक्षासाठी होमवर्क करताना दिसत आहेत. या होमवर्कचाच एक महत्वाचा भाग म्हणून त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते मनोहर लाल खट्टर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितले. परंतु पंजाब मध्ये भाजपबरोबर जागा वाटप करून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच त्यांनी आधीच केले आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या आजच्या भेटीला तो संदर्भ देखील आहे.

    पंजाब लोक काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी जोरात सुरू आहे पंजाब मध्ये मित्र पक्षाबरोबर आम्हीच सरकार स्थापन करू, असा दावा कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला आहे. काँग्रेसचे नेते मागे घेतलेल्या कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी आग्रह धरून बसलेले असताना कॅप्टन अमरिंदरसिंग मात्र शांतपणे आपले काम करताना दिसत आहेत. या शांततेमध्येच पंजाब मध्ये काँग्रेसचा संघटनेमध्ये दडलेला सुप्त ज्वालामुखी दिसतो आहे.

    Congress chaos in Parliament; Outside Captain Amarinder Singh’s homework; Meeting with the Chief Minister of Haryana

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!