इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षात मोदी सरकारने घेतलेल्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसने कौतुक केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील आपल्या स्थानाचा वापर करून भारताने हा संघर्ष थांबविण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी असे कॉँग्रेसने म्हटले आहे.Congress appreciates Modi government’s balanced role in Israel-Palestine conflict
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षात मोदी सरकारने घेतलेल्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसने कौतुक केले आहे.
भारताने संयुक्त राष्ट्संघाच्या सुरक्षा परिषदेतील आपल्या स्थानाचा वापर करून भारताने हा संघर्ष थांबविण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी असे कॉँग्रेसने म्हटले आहे.
कॉँग्रेसने म्हटले आहे की, इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन या दोघांनीही हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततापूर्ण मार्गाने चर्चेचा मार्ग निवडावा. याशिवाय इस्त्राएल आणि पॅलेस्टाईनचे शांततापूर्णा सहजीवन शक्य होणार नाही.
मोदी सरकारने आत्तापर्यंत घेतलेली भूमिका अत्यंत समतोल आणि स्वागर्ताह आहे. मात्र, सुरक्षा परिषदेचे सदस्य या नात्याने आणखी ठोस प्रयत्नांची गरज आहे.
कॉँग्रेसच्या परदेश विभाग सेलचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी १४ मे रोजी इस्त्राएल आणि हमास संघटनेला आवाहन केले की त्यांनी तातडीने हिंसाचाराचा मार्ग सोडावा. भारताने यामध्ये सक्रीय भूमिका बजावत दोन्ही देशांना शांततापूर्ण चर्चेसाठी राजी करावे.
हा प्रश्न नैतिक आणि मानवतेचा आहे. त्यामुळेच भारताची हा प्रश्न सोडविण्यासाठी जबाबदारी मोठी आहे.इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन दोन्ही भागांत दर तासाला मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढत असल्याची खंत व्यक्त करून कॉँग्रेसने म्हटले आहे
की हा प्रश्न दोन देशांच्या मार्गानेच सुटू शकेल. पूर्व जेरुसलेमला पॅलेस्टाईनची राजधानी करायला हवे.रमजानच्या पवित्र महिन्यात इस्त्राएली फोजांनी होली अल-अक्सा या पवित्र मशीदीत घुसखोरी केल्यामुळे शांततेच्या प्रयत्नांना तडा गेल्याचेही कॉँग्रेसने म्हटले आहे.