• Download App
    "मौत ते सौदागर" ते "विषारी साप" व्हाया "कबर खुदेगी"; नरेंद्र मोदींना 91 वेळा काँग्रेसची शिवीगाळ!! Congress abused Narendra modi 91 times

    “मौत ते सौदागर” ते “विषारी साप” व्हाया “कबर खुदेगी”; नरेंद्र मोदींना 91 वेळा काँग्रेसची शिवीगाळ!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कर्नाटक मधल्या जाहीर सभेत “विषारी साप” म्हटले आहे. त्यामुळे केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी काँग्रेसला अक्षरशः झोडून काढले आहे. Congress abused Narendra modi 91 times

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेत्यांनी किती वेळा नरेंद्र मोदींच्या नावाने शिवीगाळ केली आहे याची यादीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सादर केली आहे. यामध्ये “मौत के सौदागर” पासून “मोदी तेरी कबर खुदेगी” ते विषारी साप इथपर्यंत अश्लाघ्य भाषेत काँग्रेस नेत्यांनी मोदींवर केव्हा – केव्हा शरसंधान साधले याचे तपशील दिले आहेत. काँग्रेस नेत्यांनी यातून सभ्यतेच्या सर्व मर्यादा यात ओलांल्याचेही दिसत आहे आणि हे सगळे काँग्रेस नेते अशिक्षित किंवा अल्पशिक्षित नसून उच्चशिक्षित आहेत. हेही या यादीवरून स्पष्ट होत आहे.

    स्वतः सोनिया गांधींनी 2007 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम मध्ये मोदींना “मौत के सौदागर” असे संबोधले होते. त्यातून काँग्रेस नेत्यांना मोदींवर टीका करण्यासाठी “वेगळीच चालना” मिळाली आणि त्यानंतर मोदींना शिवीगाळ करण्याचा जो सिलसिला सुरू झाला, तो मल्लिकार्जुन खर्गेंपर्यंत येऊन ठेपला आहे. मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांमध्ये मणिशंकरा अय्यर, पवन खेडा, रणदीप सुरजेवाला आदी नेत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर “मोदी तरी कबर खुदेगी” असल्या घोषणांचाही या शिवीगाळीत समावेश आहे. अनेक शिव्या तर लिहू अथवा बोलूही नयेत, इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत. पण मोदींना काँग्रेसने जितक्या शिवीगाळी केल्या आहेत, तेवढी त्यांच्या यशाची कमान वर चढल्याचेही दिसले आहे.

    Congress abused Narendra modi 91 times

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा