वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘चीन वैज्ञानिक प्रगती करतोय अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; वेळीच सावध व्हा, असा इशारा माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी दिला आहे.China is making scientific progress and we are spending time on temples and mosques’; retired Naval chief warns
प्रेम स्मृती व्याख्यानमालेत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.अरुण प्रकाश म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर आपण विविध भेदाभेदांमध्ये अडकवून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच ऊर्जा खर्च झाली आहे.”
माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश पुढे म्हणाले की, “देशाला मागे नेणारे प्रश्न कायमस्वरूपी संपवण्याची गरज आहे. चीनमध्ये आर्टिफिशिल इंटेलिजन्स ( कृत्रिम बुद्धिमत्ता ), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरु आहे. त्या दृष्टीने संशोधनदेखील सुरू आहे.
अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील.”“देशात सीमावर्ती भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशात शांतता हवी आहे. आपण चीनचे आव्हान समोर ठेऊन तयारी करायला हवी.
चीनला आता एकही गोळी झाडण्याची गरज नाही. कारण भारताला घायाळ करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपल्बध आहेत.आता चीनचे आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज व्हायला हवं.”दरम्यान, २००४ ते २००६ या दोन वर्षांत अरुण प्रकाश हे देशाचे नौदलप्रमुख होते. त्यांचे हे विचार आजच्या वाढत्या हिंसाचाराच्या घडीला अतिशय मोलाचे आहेत.
China is making scientific progress and we are spending time on temples and mosques’; retired Naval chief warns
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत अत्याधुनिक चिलखती वाहने लष्करात दाखल
- रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित – किडनी तस्करीप्रकरणी अंतिम चौकशी अहवाल येईपर्यंत आदेश
- २७ किटकनाशकांवर बंदी? केंद्राकडून या आठवड्यात निर्णयाची शक्यता
- पुण्यात सीएनजी ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपयांवर