वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Chidambaram काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी सोमवारी म्हटले की, दहशतवादी पाकिस्तानातून आले हे आपल्याला कसे कळले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत चर्चेच्या काही तास आधी काँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्यांचे हे विधान आले.Chidambaram
चिदंबरम यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, ‘ते (एनआयए) या आठवड्यात त्यांनी काय केले आहे हे सांगण्यास तयार नाहीत. एनआयएने दहशतवाद्यांना ओळखले आहे का? किंवा ते कुठून आले आहेत हे शोधून काढले आहे का? कोणास ठाऊक, ते देशातीलच दहशतवादी असू शकतात. तुम्ही असे का गृहीत धरत आहात की ते पाकिस्तानातून आले आहेत? याचा कोणताही पुरावा नाही.’Chidambaram
ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत 16 तासांची बैठक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सोमवारी लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर १६ तासांची सतत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दुपारी २ वाजता चर्चेला सुरुवात केली. गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
विरोधी पक्षाच्या वतीने, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि इतर खासदारांनी लोकसभेत सरकारला प्रश्न विचारले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षाचे खासदार पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यावर सरकारकडून उत्तरे मागत आहेत.
Chidambaram Questions Pahalgam Terrorist Origin, NIA Evidence
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह 3 दहशतवादी ठार; ऑपरेशन महादेवअंतर्गत कारवाई
- DR Congo : पूर्व DR काँगोमध्ये चर्चवर दहशतवादी हल्ला, 38 मृत्यू; लोक प्रार्थना सभेला उपस्थित होते
- ज्यांनी पाकिस्तान विरोधात काहीच केले नाही, ते मोदी सरकारला विचारताहेत तुम्ही आणखी पुढे का गेला नाहीत??; परराष्ट्र मंत्र्यांचा लोकसभेत हल्लाबोल
- Turkey : तुर्कीने दोन सर्वात शक्तिशाली बॉम्बची चाचणी घेतली; 970 किलो वजनाचे GAZAP आणि NEB-2 घोस्ट बॉम्ब