वृत्तसंस्था
नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने अत्यंत महत्वाची नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय वरिष्ठ निरीक्षक नेमण्यात आले आहे. पण ही नवी जबाबदारी देऊन त्यांच्याकडची मुख्यमंत्रीपदाची जुनी जबाबदारी काँग्रेस हायकमांड काढून घेणार का?, असा प्रश्न तयार झाला आहे.Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel Uttar Pradesh Congress Central Inspector; Remove the old with new responsibilities?
भूपेश बघेल यांनी काँग्रेस हायकमांड अर्थात सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांचे आभार व्यक्त केले आहेत. नवी जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याची ग्वाही दिली आहे. पण त्याच वेळी ही शंका आहे की काँग्रेस हायकमांड कोणत्याही नेत्याकङे एकाच वेळी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत नाही. एखादी नवी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्या नेत्याकडून जुनी जबाबदारी काढून घेऊन दुसऱ्या नेत्याकडे सोपवण्यात येते, असा अनुभव आहे.
पंजाबमध्ये याचे प्रत्यंतर आले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बंडखोरीला तथाकथित स्वरूपात मान देऊन काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून घालवले. पण ज्या हेतूने नवज्योत सिंग सिद्धू यांनी बंड केले होते, तो हेतू काँग्रेस हायकमांडने साध्य करू दिला नाही. त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री नेमले नाही. त्यांच्याऐवजी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री नेमले. असेच छत्तीसगडमध्ये घडणार नाही ना? अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
मंत्री टी. एस. सिंगदेव हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेतच. परंतु, भूपेश बघेल यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी छत्तीसगडमध्ये नेतृत्वबदल होणार नाही, असा दावा केला आहे. काँग्रेस हायकमांडने नवी जबाबदारी देऊन आपल्यावर विश्वास व्यक्त केला मी आभारी आहे, असे वक्तव्य भूपेश बघेल यांनी केले आहे. पण पंजाबचा अनुभव लक्षात घेता छत्तीसगडमध्ये नेतृत्व बदल होणारच नाही याची छातीठोकपणे एकही नेता ग्वाही देताना दिसत नाही.
Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel Uttar Pradesh Congress Central Inspector; Remove the old with new responsibilities?
महत्त्वाच्या बातम्या
- प्रदूषण कमी करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी चालवली कार ‘इलेक्ट्रिक कार ‘ , सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी मिळाला चांगला प्रतिसाद
- जगातील सर्वात लहान खगोलशास्त्रज्ञ : ब्राझीलची आठ वर्षीय निकोल, शोधले 18 लघुग्रह
- BiG NEWS : शिवसेनेत घरका भेदी ! अनिल परबांचं ऑफिस तोडायची ऑर्डर अन् रामदास कदमांना कोण आनंद ! तीन ऑडिओ क्लिप व्हायरल
- Artificial Kidney : ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार कृत्रिम किडनी ; डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटच्या त्रासातून मुक्ती ; जाणून घ्या