सध्या सर्वत्र भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना 2019च्या विधानसभेला तिकीट नाकारल्याची पुष्कळ चर्चा रंगली होती. मात्र, नागपूर विधान परिषदेसाठी भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पसंती दिली होती. तर दुसरीकडे, भाजपमधून आयात केलेले डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसने तिकीट दिलं. यामुळे निकालापर्यंत या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. Chandrashekhar Bavankule Won nagpur MLC Elections, Gain 44 votes Of MVA, Chhotu Bhoyar who left BJP and joined Congress got only 1 vote
विशेष प्रतिनिधी
नागपूर : सध्या सर्वत्र भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना 2019च्या विधानसभेला तिकीट नाकारल्याची पुष्कळ चर्चा रंगली होती. मात्र, नागपूर विधान परिषदेसाठी भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पसंती दिली होती. तर दुसरीकडे, भाजपमधून आयात केलेले डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसने तिकीट दिलं. यामुळे निकालापर्यंत या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
काँग्रेसने भाजपचा नगरसेवक फोडून उमेदवारी दिल्याने भाजपने सावधगिरी बाळगत आपले नगरसेवक सहलीला पाठवले. मतदान फुटू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. मतदानाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर केला. बावनकुळेंना या सावळ्या गोंधळाचा फायदा झाला अन् त्यांनी बाजी मारली.
559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळाली, तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत. तसेच भाजपमधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले. विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने एकतर्फी लागलाय.
महाविकास आघाडीत गोंधळ
नागपूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे. तिन्ही पक्ष सर्व ठिकाणी भाजपचा सहज पराभव करू असे महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते, मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर यांचा पटोलेंनी ऐनवेळी पाठिंबा काढून घेत अपक्ष उमदवाराला दिला. या सर्व गोंधळामुळे भाजपचा विजय सुकर झाला. भाजपची 318च मते होती, मात्र बावनकुळेंना तब्बल 362 मते मिळाली. अशा प्रकारे महाविकास आघाडीची 44 मते फोडून त्यांनी मोठा विजय मिळवल आहे.
Chandrashekhar Bavankule Won nagpur MLC Elections, Gain 44 votes Of MVA, Chhotu Bhoyar who left BJP and joined Congress got only 1 vote
महत्त्वाच्या बातम्या
- विधान परिषदेत पराभव काँग्रेस – शिवसेनेचा; पण जास्त आवाज राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा!!
- Terrorist Attack : श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचे निधन, आतापर्यंत ३ शहीद
- वेदमूर्ती डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांचे डोंबिवलीमध्ये निधन
- हिवाळी अधिवेशन : ईडी-सीबीआय संचालकांचा कार्यकाळ वाढणार! राज्यसभेत आज दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार
- राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा मोर्चा; पण तृणमूळ काँग्रेसचे खासदार मोर्चाऐवजी संसदीय कामकाजात सहभागी!!