वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतचे आदेशही काढले गेले आहेत.CEO of Serum Institute, Pune ‘Y’ grade security to Adar Poonawala
कोरोनाविरोधी लस कोव्हिशिल्डच्या निर्मितीमुळे सीरम इन्स्टिट्यूट जगभरात आणखी प्रसिद्ध पावली आहे. भारतात लसीचे मोठे उत्पादन झाले असून 11 कोटी लोकांना डोस दिले गेले आहेत. विशेष म्हणजे ही लस कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी ठरली आहे. भारताच्या मित्र राष्ट्रांनाही लस पाठवली गेली आहे.
अदार पूनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी (ता.28) दिले. त्यामुळे देशभरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कार्यालयातही त्यांना ही सुरक्षा पुरविली जाणार आहे.
तशी सुरक्षा पुरविण्याचे आदेश केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे पुनावाला हे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या कडक सुरक्षेत दिसणार आहेत.
वाय दर्जाची सुरक्षा म्हणजे काय ?
हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. कमी धोका असणाऱ्या लोकांना ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये 11 सुरक्षा जवान असतात. त्यामध्ये दोन पीएसओ (खाजगी सुरक्षारक्षक) असतात. यामध्ये कोणत्याही जवानाचा समावेश नसतो. भारतामध्ये सर्वात अधिक वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात येत असते.
CEO of Serum Institute, Pune ‘Y’ grade security to Adar Poonawala
महत्त्वाच्या बातम्या
- बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप
- परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले १४ रुग्णांचे प्राण
- Corona Updates In India : भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे ३२९३ मृत्यू, ३.६० लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद
- भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण
- ठाण्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग, दुसरीकडे शिफ्ट करताना चार रुग्णांचा मृत्यू