पंजाबमधील राजकीय गोंधळादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेस अध्यक्षपदासाठी खा. परनीत कौर यांचे नाव समोर येत आहे. परनीत कौर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. त्या पंजाबच्या पटियाला येथून लोकसभा खासदार आहेत. सूत्रांनुसार, सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर हायकमांड त्यांची समजूत घालू इच्छित नाही. captains wife mp preneet kaur may become punjab congress president high command in no mood to persuade sidhu sources
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमधील राजकीय गोंधळादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेस अध्यक्षपदासाठी खा. परनीत कौर यांचे नाव समोर येत आहे. परनीत कौर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. त्या पंजाबच्या पटियाला येथून लोकसभा खासदार आहेत. सूत्रांनुसार, सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर हायकमांड त्यांची समजूत घालू इच्छित नाही.
सिद्धू यांच्या राजीनाम्याने काँग्रेस नाराज
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे पक्ष नेतृत्व खूप नाराज आहे आणि जर सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर त्यांच्या जागी दुसऱ्यास पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांची जागा प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाला बसवणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
पक्ष नेतृत्वापुढे 3-4 नावांचे पर्याय
पक्षाच्या नेतृत्वापुढे 3-4 नावांचे पर्याय आहेत. राहुल आणि प्रियांका गांधी दोघेही सिद्धूंच्या वागण्यावर नाराज आहेत. प्रियांका गांधींचे सल्लागार विभाकर शास्त्री यांनी तर सिद्धू यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सध्या सिद्धू आणि हायकमांड यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही.
कॅप्टन भाजपमध्ये गेल्यास केंद्रात मंत्रिपद!
दुसरीकडे, काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. अमित शहा आणि कॅप्टन अमरिंदर यांची सुमारे 45 मिनिटे भेट झाली. अमित शहा यांच्यानंतर कॅप्टन अमरिंदर आता जेपी नड्डा यांची भेट घेऊ शकतात. भाजप राज्यसभेच्या माध्यमातून कॅप्टन अमरिंदर यांना केंद्रात मंत्री बनवू शकते, असा अंदाज आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्री बनण्याची ऑफरही देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
captains wife mp preneet kaur may become punjab congress president high command in no mood to persuade sidhu sources
महत्त्वाच्या बातम्या
- बेरोजगार कन्हैयाकुमारकडे १८ कोटी रुपयांची संपत्ती, खर्च चालवितात कसा हा देखील प्रश्न
- राहूल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी धमकावले, गुंडगिरी असल्याचा नेटीझन्सचा आरोप
- फी माफीसाठी विद्यार्थ्यांवर डोके आपटून घेण्याची वेळ, रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी महाविद्यालयात घटना
- कंगणाने पुन्हा करण जोहरला केले टार्गेट!