• Download App
    कॉँग्रेसमधील सी म्हणजे कनींग- धूर्त, भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपावर बसपच्या मायावती यांचा कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल|C in Congress means cunning, BSP's Mayawati lashes out at Congress over BJP's B-team

    कॉंग्रेसमधील सी म्हणजे कनींग- धूर्त, भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपावर बसपच्या मायावती यांचा कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाचे भारतीय जनता पक्षाशी संगनमत असल्याचा आरोप करत बसप ही भाजपाची बी टीम असल्याची टीका कॉँग्रेसने केला आहे. यावरून बसपच्या सर्वेसर्वो मायावती यांनी कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.C in Congress means cunning, BSP’s Mayawati lashes out at Congress over BJP’s B-team

    कॉँग्रेसमधील सी म्हणजे इंग्रजीतील कनींग शब्द आहे. याचा अर्थ धूर्त होतो. बहुजन मतांच्या जोरावर सत्तेवर येऊनही कॉँग्रेसने त्यांना कायम असहाय्य करून ठेवले, अशी टीका त्यांनी केली आहे.



    याबाबत मायावती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कॉंग्रेसमधील सी म्हणजे कनींग आहे. हा एक ‘धूर्त’ पक्ष आहे. बहुजनांना कॉँग्रेसने कायमच असहाय्य ठेवले आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार असतानाही त्यांनी बहुजनांना गुलामीत ठेवले होते.त्याच काळात बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार नव्हते.

    मायावती म्हणाल्या, उत्तर प्रदेशातही ऑक्सिजनवर चालणाºयाा कॉंग्रेसचे म्हणणे आहे की बसपाचा ‘बी’ म्हणजे ‘भाजपा’. त्यांचे हे आरोप अत्यंत आक्षेपार्ह आहेत. बसपचा ‘बी’ म्हणजे बहुजन, ज्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींचा समावेश आहे. धार्मिक अल्पसंख्यक आणि इतर उपेक्षित घटकांचे लोक आमच्या सोबत आहेत. त्यांनाच बहुजन म्हटले जाते.

    मायावतींनी असा दावा केला की, राज्यातील निवडणुका कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपाच्या काळात कधीही निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष झाल्या नाहीत. कारण सत्तेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. बसपच्या शासनकाळात मात्र सगळ्या निवडणुका नि:पक्ष झाल्या.

    C in Congress means cunning, BSP’s Mayawati lashes out at Congress over BJP’s B-team

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IRGC : “युद्ध तुम्ही सुरू केले, आता आम्ही ते संपवू”, ‘आयआरजीसी’कडून ट्रम्प यांना उघडपणे धमकी!

    DGCA Warn : DGCAचा इशारा- एअर इंडियाचा परवाना रद्द करू, ऑपरेशन नियमांकडे सतत दुर्लक्ष

    Arvind Kejriwal : गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमधल्या विजयामुळे केजरीवाल खुश, संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे आव्हान!!