• Download App
    निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत भाजपाच्या आठ नेत्यांची फेरमतमोजणीची मागणी, कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका|Eight BJP leaders file petition in Kolkata High Court seeking recount

    निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत भाजपाच्या आठ नेत्यांची फेरमतमोजणीची मागणी, कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची मागणी भारतीय जनता पक्षाच्या आठ नेत्यांनी कोलकत्ता उच्च न्यायालयात केली आहे. दोन नेत्यांच्या याचिकेची सुनावणी सोमवारी कोलकत्ता उच्च न्यायालयात होईल.Eight BJP leaders file petition in Kolkata High Court seeking recount

    माणिकटोला विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या कल्याण चौबे यांनी सांगितले की, मी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, फेर मतमोजणी करण्याची विनंती केली. माणिकटोला या माझ्या मतदारसंघात निवडणुकीच्या वेळी हिंसाचार झाला होता. मतदानाच्या दिवशी माझ्यावर दोनदा हल्ले होते.

    मतमोजणीच्या दिवशी तृणमूल कॉँग्रेसचे अनेक अनधिकृत मतदान प्रतिनिधी मतमोजणी बूथवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी राज्या निवडणूक आयोग आणि रिटर्निंग ऑफिसरदोन्हीकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे, मी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर फेर मतमोजणीचा विचार करावा, अशी विनंती केली आहे.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील फेरमतमोजणीसाठी काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्याही आठ नेत्यांनी फेरमतमोजणीची मागणी केलीआहे.

    जलपाईगुडी मतदारसंघात टीएमसीच्या उमेदवाराकडून पराभव झालेले भाजपचे उमेदवार सौजित सिंघा यांनीही निकालाचा फेरआढावा घेण्याची मागणी केली आहे. सिंहा यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की पुन्हा मतमोजणी केल्यास निकाल पूर्णपणे वेगळा असेल . सिंघा म्हणाले, पुन्हा मतमोजणी व्हायला हवी आहे.

    मला शंभर टक्के खात्री आहे की निकाल पूर्णपणे भिन्न लागतील. मला फक्त ९४१ मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर मला प्रत्येकजण असेच विचारत होता की हे कसे घडले अनेकांना निकालाबद्दल शंका होती. मतदानाच्या दिवशी बºयाच जणांनी ईव्हीएम असलेल्या वाहनाचे घेराव केले.

    मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्रावर भाजपाच्या केवळ ५० कार्यकर्त्यांना परवानगी होती मात्र तृणमूलचे मात्र १०० हून अधिक कार्यकर्ते होते. ते पुढे म्हणाले, मतमोजणी चार खोल्या १६ फेऱ्यांमध्ये पार पडली. पहिल्या मतमोजणीमध्ये मी स्वत: अग्रणी होतो, पण अचानक मी अचानक पिछाडीवर पडलो आणि विरोधी टीएमसी उमेदवाराला १००० हून अधिक मतांनी आघाडी देण्यात आली, हे स्पष्ट आहे.

    टीएमसीच्या उमेदवारांना मतमोजणीची गती आणि मते जुळत नाहीत. मग मी रिटर्निंग ऑफिसरला (आरओ) एक पत्र लिहिले आणि त्याला विचारले की तो एका खोलीच्या किमान शेवटच्या फेरीची मतमोजणी करावी. यामध्ये सर्व काही ठिक वाटले तर मी माझा पराभव स्वीकारतो. शंका असली तरी संपूर्ण मतमोजणी करावी लागेल. परंतु आरओने माझी बाजू फेटाळून लावली.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणाºया याचिकेवरील निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने 24 जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. निवडणूक आयोगाने नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक लढविल्यामुळे भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांना विजयी घोषित केले होते.

    पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी असा आरोप केला की विधानसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसर यांनी फेरमतमोजणीची धमकी दिली होती.ममता बॅनर्जी यांनी कोलकत्ता उच्च न्यायालया निकालाला आव्हान दिल्यानंतर २० जून रोजी भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले होते की कमी फरकाने पराभूत झालेल्या ५० जागांवर फेरमतमोजणीची मागणी आम्ही करणार आहोत.

    गेल्या महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉंग्रेसने २१३ जागा जिंकल्या. भारतीय जनता पक्षाने 77 जागा मिळविल्या. विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला.

    Eight BJP leaders file petition in Kolkata High Court seeking recount

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध