• Download App
    इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस प्रोत्साहन देणार; ग्राहकांना नोंदणी शुल्कात देणार भरघोस सूट।Buying electric cars and bikes will be easy The government is bringing new rules india

    इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस प्रोत्साहन देणार; ग्राहकांना नोंदणी शुल्कात देणार भरघोस सूट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे आहे. पारंपरिक इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषण टाळण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातही त्यासाठी नवे नियम आणले जाणार आहेत. Buying electric cars and bikes will be easy The government is bringing new rules india

    देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. लोकांनी ती वाहने खरेदी करावीत यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने एक प्रारूप अधिसूचना जारी केली. त्यात नोंदणी प्रमाणपत्र (RC) जारी करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी फी भरण्यापासून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदी केल्यानंतर त्याच नोंदणी शुल्क किंवा नूतनीकरणासाठी लागणारं शुल्क माफ केले जाऊ शकतं.



    अधिसूचनेत असे म्हटले आहे की “नियम २ (यू) मध्ये परिभाषित केल्यानुसार बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना त्यांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र जारी करणं किंवा नव्या रजिस्ट्रेशन मार्कला असाइनमेंटसाठी शुल्क भरण्यातून सूट देण्यात येईल.” मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना सूट देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना मिळणार आहे, असं मंत्रालयाचं मानणं आहे.

    Buying electric cars and bikes will be easy The government is bringing new rules india

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स