• Download App
    सांगली, कोल्हापुरात पुराच्या आठवणी जाग्या, रस्त्यावर, घरात पाणी; मुसळधार पावसाचा फटका।Flooding in Sangli, Kolhapur, Water on the streets, in homes; A torrential downpour

    सांगली, कोल्हापुरात पुराच्या आठवणी जाग्या, रस्त्यावर, घरात पाणी; मुसळधार पावसाचा फटका

    वृत्तसंस्था

    कोल्हापूर : मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना झोडपून काढले. कोल्हापुरात तर अनेक घराघरात पाणी शिरले. सांगलीत अनेक रस्त्यावर तळी साचली. त्यामुळे दोन वर्षापूर्वी आलेल्या पुराच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आणि कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोक चुकला. त्यावेळी पुण्यासह राज्यभरातून मदत पोचविण्यात आली होती. Flooding in Sangli, Kolhapur, Water on the streets, in homes; A torrential downpour

    गडहिंग्लज तालुक्यात पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतही दमदार पाऊस झाला. सोलापुरातील सांगोला तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.

    कोल्हापुरात घराघरांत पाणी शिरले

    मुसळधार पावसाने कोल्हापूरकरांना झोडपले. अनेकांच्या घरांत पाणी शिरले. काही ठिकाणी झाडे कोसळून मार्ग बंद झाले. विजेचा पुरवठाही खंडित झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. दुपारनंतर पावसास सुरुवात झाली. मुसळधा पावसाने दोन तास कोल्हापूरकरांना झोडपून काढले.



    सांगली शहराला तळ्याचे स्वरूप

    सांगली शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागांत आज जोरदार पाऊस झाला. या पावसाने सांगली शहरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले. अनेक रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते.अनेक भागांत दुपारनंतर पाऊस झाला. सांगलीत दीड तास मुसळधार पाऊस कोसळत होता. शिवाजी मंदिर परिसर, स्टेशन रोड, स्टॅन्ड परिसरात पाणीच पाणी झाले. तसेच कवठे महांकाळ, जत, पलूस, मिरज तालुक्यांतही सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

    आश्रमशाळेचे पत्रे उडाले

    सांगोला-अकलूज रोड वरील भारतीय संस्कृती ज्ञानमंदिर या निवासी आश्रमशाळेच्या 8 वर्गखोल्यांचे पत्रे, अँगल उडून 200 फुटांवर फेकले गेले.
    या घटनेत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले.

    सलग चौथ्या दिवशी नगरमध्ये हजेरी

    नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत आणि जामखेड तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. कोपरगाव आणि राहाता तालुक्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्येही पाऊस झाला.

    Flooding in Sangli, Kolhapur, Water on the streets, in homes; A torrential downpour

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’