समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा केला पराभव; विधानसभेच्या ३९६ आमदारांनी केले मतदान
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून समाजवादी पक्षाचा पराभव झाला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही जागा जिंकल्यानंतर भाजपाचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. BJP wins both the seats in Uttar Pradesh Vidhan Parishad byelection
उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विधानसभेच्या 396 आमदारांनी मतदान केले. एका जागेवर भाजपाच्या पद्मसेन चौधरी यांना 279 तर सपाच्या रामकरण यांना 116 मते मिळाली. याशिवाय दुसऱ्या जागेवर भाजपचे मानवेंद्र सिंह यांना 280 आणि सपाचे राम जतन राजभर यांना 115 मते मिळाली.
भाजपाच्या विजयानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ट्विट केले की, “उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल पद्मसेन चौधरी आणि श्रीमान मानवेंद्र सिंह, डबल इंजिन सरकारचे उमेदवार यांचे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण विश्वास आहे की, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार दोन्ही विजयी सन्माननीय सदस्यांचे सार्वजनिक आचरण, परिश्रम आणि अनुभव ‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश’चा संकल्प साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतील. तुम्हा सर्वांना उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा.”
BJP wins both the seats in Uttar Pradesh Vidhan Parishad byelection
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार
- पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!
- नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!