वृत्तसंस्था
कोलकता : पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर क्रूड बॉम्ब फेकले असून वाहनाच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हा हल्ला चढविल्याच्या आरोप घोष यांनी केला. BJP state president Dilip Ghosh injured in Trinamool Congress attack; Vehicle vandalism
दिलीप घोष म्हणाले, पश्चिम बंगालमधील लोकशाहीची अवस्था दयनीय झाली आहे. टीएमसीचे झेंडे घेऊन गेलेल्या गुंडांनी माझ्या वाहनावर क्रूड बॉम्ब फेकले आणि माझ्या वाहनाची काच फोडली. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा हल्ला केला. अनेक गाड्यांची तोडफोड केली. पोलिस कर्मचारी या प्रकरणी माघार घेतलेले दिसले.