वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी सुरु झाली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. BJP government prepares for swearing in in Goa; Prime Minister Narendra Modi and other dignitaries will be present
शपथविधी बुधवारी ( २३ मार्च) दुपारी चार वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या सभागृहात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय पातळीवरील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ४० मतदारसंघांत प्रत्येकी एका ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणी मोठ्या पडद्यावर पाहण्याची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत हेच कायम राहतील, असेही शुक्रवारी भाजपकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. त्यांच्या मंत्रिमंडळात कोणते नवे चेहरे असतील याविषयी उत्सुकता कायम आहे.
BJP government prepares for swearing in in Goa; Prime Minister Narendra Modi and other dignitaries will be present
महत्त्वाच्या बातम्या
- द काश्मीर फाइल्स’ ची १२०.३५ कोटींची कमाई
- चंद्रशेखर माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांची तंबाखू सोडविण्यासाठी झडती घ्यायचे तर नरेंद्र मोदी पुडी लपून ठेवायचे
- अभिनेता विरुध्द फॅशन डिझायनर, शत्रूघ्न सिन्हा यांच्याविरुध्द भाजपाच्या अग्निमित्रा पॉल
- पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या पुढे जाता आले नाही, गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका