• Download App
    काँग्रेसच्या पुनरूज्जीवनासाठी एका पाठोपाठ एक फॉर्म्युले...पण नुसतीच चर्चा; निर्णय लटकलेलेच...!! कमलनाथ कार्यकारी अध्यक्ष?? Big formulas for congress revival; kamal nath to be congress working president??

    काँग्रेसच्या पुनरूज्जीवनासाठी एका पाठोपाठ एक फॉर्म्युले…पण नुसतीच चर्चा; निर्णय लटकलेलेच…!! कमलनाथ कार्यकारी अध्यक्ष??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – काँग्रेसच्या राजकीय पुनरूज्जीवनासाठी एका पाठोपाठ एक फॉर्म्युले पुढे येत आहेत. पण त्यावर नुसतीच चर्चा होतीय. निर्णय लटकलेलेच राहताहेत. अशी गेल्या काही महिन्यांमधली अवस्था आहे. Big formulas for congress revival; kamal nath to be congress working president??

    परवाच्या प्रशांत किशोर यांनी सोनिया – राहुल – प्रियांका त्रिकूटाशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसच्या राजकीय पुनरूज्जीवनाच्या चर्चेला धुमारे फुटले. यात प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशापासून ते कमलनाथ यांच्या काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनण्यापर्यंतच्या चर्चांचा समावेश होतो आहे. शिवाय यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्यातल्या राजकीय वादाचे उपकथानक आहेच.

    कमलनाथ आता १० जनपथवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचल्याची बातमी आली. त्या पाठोपाठ प्रियांका गांधीही १० जनपथवर पोहोचल्याची बातमी आली. यातून कमलनाथ यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्यात येणार असल्याच्या फॉर्म्युल्याची चर्चा पुढे आली आहे.

    प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करून राहुल गांधींचे सल्लागार होणार. राहुल गांधी काँग्रेस संसदीय दलाचे नेते होणार हे फॉर्म्युले आधीपासून चर्चेला आलेच आहेत. कमलनाथ यांच्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या फॉर्म्युल्याची यात आत्ताच भर पडली आहे.

    हे सगळे फॉर्म्युले चर्चेच्या पातळीवर राहात असून यापैकी एकावरही निर्णय अद्याप झालेला नाही. यामध्ये उपकथानक असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्यातील वादावर फॉर्म्युलाची चर्चा आहे. सिध्दू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविणे. प्रदेश पातळीवर दोन कार्यकारी अध्यक्ष नेमणे आणि अमरिंदर सिंग यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवून त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढील वर्षी निवडणूकीला सामोरे जाणे हा महाफार्म्युला चर्चेला आला आहे… पण त्यावर देखील निर्णय बाकी आहे. तोडगा एक दोन दिवसांमध्ये निघेल, असे पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीष रावत यांनी सांगितले आहे.

    सुनील जाखड हे सध्या पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. फॉर्म्युल्यानुसार खरेच निर्णय झाला तर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भांडणात सुनील जाखडांना आपले पद गमवावे लागणार आहे. पंजाबमधील वादावर काँग्रेसश्रेष्ठींनी बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी, महासचिव के. सी. वेणूगोपाळ, प्रियांका गांधी आणि हरीष रावत उपस्थित होते. यावेळी या वादावर हा तोडगा सुचवण्यात आल्याची चर्चा आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही.

    Big formulas for congress revival; kamal nath to be congress working president??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!