• Download App
    …तर तुम्ही माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्या!शस्त्रक्रियेपूर्वी उद्धव ठाकरेंनी मोदींना केला होता भावनिक व्हिडिओ कॉल.. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंचा दावा!Before Going For Surgery, CM Uddhav Thackeray Had Called PM Modi, Anil Thatte Made This Claim

    …तर तुम्ही माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्या!शस्त्रक्रियेपूर्वी उद्धव ठाकरेंनी मोदींना केला होता भावनिक व्हिडिओ कॉल.. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंचा दावा!

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. परंतु, यावेळचा एक किस्सा आता सांगितला जात आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि हा दावा ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. थत्ते यांनी यावेळचा प्रसंग आपल्या यूट्यूब चॅनलवर रंगवून सांगितला आहे. Before going for surgery, CM Uddhav Thackeray had called PM Modi, Anil Thatte made this claim


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. परंतु, यावेळचा एक किस्सा आता सांगितला जात आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि हा दावा ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. थत्ते यांनी यावेळचा प्रसंग आपल्या यूट्यूब चॅनलवर रंगवून सांगितला आहे.

    आपल्या व्हिडिओमध्ये अनिल थत्ते म्हणतात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा शस्त्रक्रियेसाठी जात होते तेव्हा काहीसे विचारात पडलेले होते. त्यांनी काही क्षण विचार करून कुटुंबीयांसमोर पंतप्रधान मोदींना बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर सर्व जमवाजमव करायला काही मिनिटे लागली. काही मिनिटांतच खुद्द पंतप्रधान मोदी फोनवर आले. हा व्हिडिओ कॉल होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ऑपरेशनला जात असल्याचे सांगितले.



    थत्ते यांनी यांनी दावा केलाय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींवर श्रद्धा आहे. ते त्यांना स्वर्गीय बाळासाहेबांसमान मानतात. ते मोदींना म्हणाले की, मी आता ऑपरेशनला जात आहे. ही अवघड शस्त्रक्रिया आहे. जर काही अनर्थ झाला तर माझ्या कुटुंबाची काळजी घ्या. यावर पंतप्रधान मोदींनीही काहीही काळजी करू नका. सर्व काही सुखरूप पार पडेल, असे आश्वस्त केले. तर हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी त्यांच्या गगनभेदी यूट्यूब चॅनलवर नुकताच शेअर केला आहे. थत्ते यांनी ही माहिती दोन्ही बाजूंनी कन्फर्म केल्याचा दावा केला आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरंच अवघड शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर त्यांना अनेक दिवस विश्रांती घ्यावी लागली. पण तरीही त्यांनी राज्य कारभारातही वेळोवेळी सहभाग नोंदवला. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांनी आता राज्य कारभार इतरांवर सोपवावा, असा सल्लाही त्यांना दिला होता.

    Before Going For Surgery, CM Uddhav Thackeray Had Called PM Modi, Anil Thatte Made This Claim

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही