• Download App
    बाहुबली फेम प्रभासने आंध्र प्रदेश मधील पूरग्रस्ताच्या मदतीसाठी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले | Bahubali fame Prabhas donates Rs 1 crore to CM relief fund for flood victims in Andhra Pradesh

    बाहुबली फेम प्रभासने आंध्र प्रदेश मधील पूरग्रस्ताच्या मदतीसाठी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये पूर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई सहजासहजी भरून निघणार नाही. पण यासाठी आता बरेच मदतीचे हात आता पुढे येत आहेत. बाहुबली फेम अभिनेता प्रभास याने देखील आंध्र प्रदेशमध्ये पूरग्रस्ताच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने तब्बल 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले आहेत. प्रभास प्रमाणे दक्षिणेतील राम चरण, महेशबाबू, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन यासारख्या कलाकारांनी देखील मोठी रक्कम आंध्र प्रदेशमधील पूरग्रस्तांसाठी दान केली आहे.

    Bahubali fame Prabhas donates Rs 1 crore to CM relief fund for flood victims in Andhra Pradesh

    प्रभास याचा राधेश्याम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री पूजा हेगडे हिच्यासोबत दिसून येणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या आदि पुरुष या चित्रपटाचे शूटिंगदेखील पूर्ण झालेले आहे. या चित्रपटामध्ये तो क्रीती सेनॉन सोबत दिसणार आहे. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतचा प्रोजेक्ट के हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.


    मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावकडून पत्नीचा छळ, गुन्हा दाखल, पत्नी आपल्यापेक्षा मोठी अभिनेत्री म्हणून मारहाण


    बाहुबली च्या प्रचंड यशानंतर प्रभास हा भारतातील प्रत्येक घराघरामध्ये एक ओळखीचा चेहरा आहे. बाहुबली या चित्रपटाने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले होते. आता या मोठय़ा अभिनेत्यांने मोठा मदतीचा हात पुढे केला आहे,हे अतिशय कौतुकास्पद आहे.

    Bahubali fame Prabhas donates Rs 1 crore to CM relief fund for flood victims in Andhra Pradesh

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव

    मोदी सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, तब्बल 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस दिली परवानगी

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा