• Download App
    |समाजवादी पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आझम खान आणि त्यांच्या मुलाला केले बाहेर, गेल्या निवडणुकीत जया प्रदा यांच्याविषयी केले होते अश्लिल वक्तव्यAzam Khan and his son excluded from Samajwadi Party's list of star campaigners

    समाजवादी पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आझम खान आणि त्यांच्या मुलाला केले बाहेर, गेल्या निवडणुकीत जया प्रदा यांच्याविषयी केले होते अश्लिल वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : गेल्या निवडणुकीत खासदार जया प्रदा यांच्याविषयी अश्लिल वक्तव्य करणारे आझम खान आणि त्यांच्या मुलाला अखेर समाजवादी पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून बाहेर काढले आहे. आझम खान यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पक्षाला तोटा होऊ नये हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.Azam Khan and his son excluded from Samajwadi Party’s list of star campaigners

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी समाजवादी पार्टी आपली स्टार प्रचारक यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारक यादीत समाजावादी पाटीर्तील सर्वात शक्तीशाली नेते अशी ओळख असणारे आझम खान यांना स्थान मिळालेले नाही. आझम खान हे भ्रष्टाचार प्रकरणी फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहेत.



    त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. नुकताच त्यांच्या मुलाला जामीन मंजूर झाली आहे.स्टर प्रचारक यादीत पहिले स्थान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचेच आहे.

    यानंतर अखिलेश यादव यांचे नाव आहे. तिसऱ्या स्थानावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरण मय नंदा यांना स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि पार्टी महासचिव राम गोपाल यादव आणि जया बच्चन यांच्या नावाचा स्टार प्रचारक यादीत समावेश आहे.

    लोकसभा निवडणुकीत आझम खान यांनी भाजपाच्या खासदार जया प्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचार बंदी घातली आहे. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या सहाव्या स्थानावर, प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल आणि विधनासभा नेते राम गोविंद चौधरी हे अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानावर आहेत. भाजप सोडून समाजवादी पार्टीत सहभागी झालेले स्वामी प्रसाद मौर्य हे ११ व्या स्थानी आहे.

    Azam Khan and his son excluded from Samajwadi Party’s list of star campaigners

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’