विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाबमधील विधानसभा निवडणूक यावेळी चांगलीच चुरशीची होणा असल्याने आत्तापासूनच आयाराम-गयाराम संभ्रमात आहेत. कॉँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अवघ्या सहा दिवसांनी आमदार बलविंदर सिंग लड्डी यांनी पुन्हा कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.Ayaram-Gayaram from Punjab, MLA joinied BJP and returned again to Congress in six days
पंजाब कॉँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी आणि मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या उपस्थितीत आपण कॉँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्याचे लड्डी यांनी सांगितले. श्री हरगोबिंदपूरचे आमदार लड्डी यांनी कादियानचे आमदार फतेहजंग सिंग बाजवा यांच्यासह २८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
भाजपाचे पंजाब प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला होता. त्यानंतर भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेससोबत युती केली. त्यामुळे लड्डी यांनी पुन्हा कॉँग्रेसमध्ये परतण्याचा मार्ग अवलंबला असे बोलले जात आहे.
2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत, कॉंग्रेसने 77 जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले होते. 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत आम आदमी पक्ष 20 जागा जिंकणारा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दल (एसएडी) केवळ 15 जागा जिंकू शकला, तर भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या.
Ayaram-Gayaram from Punjab, MLA joinied BJP and returned again to Congress in six days
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात
- आरक्षण मागण्यसाठी लढायचं होतं तेव्हा ओबीसी लढायला तयार नव्हते, जितेंद्र आव्हाडच्या ओबीसींबाबत आक्षपार्ह वक्तव्यामुळे संताप
- गोव्यातही महाविकास आघाडी, संजय राऊतांवर जबाबदारी, कॉँग्रेसकडे मागितल्या सात ते आठ जागा