• Download App
    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण करा, पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी, अतुल भातखळकर यांचा शिवसेनेला इशारा |Atul Bhatkhalkar's warning to Shiv Sena

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण करा, पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी, अतुल भातखळकर यांचा शिवसेनेला इशारा

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, अशाा इशारा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे, अशोही त्यांनी म्हटले आहे.Atul Bhatkhalkar’s warning to Shiv Sena


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, अशाा इशारा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे, अशोही त्यांनी म्हटले आहे.

    अयोध्येतील राम मंदिर निमार्णात कथित जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेकडून आरोप केले जात आहेत. शिवसेनेने म्हटले आहे, की राम मंदिर निमार्णात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वत: पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवे. शिवसेनेचे मुखपत्र अशालेल्या सामनामध्ये म्हटले आहे,



    की राम मंदिर कामाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे व्हायरल हवी. कारण ती एक राष्ट्रीय गौरवाची गोष्ट आहे. या वरून भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , काँग्रेस , शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे.

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा.लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही, अशोही त्यांनी म्हटले आहे.

    Atul Bhatkhalkar’s warning to Shiv Sena

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादाबाबत जगाचे दुटप्पी निकष केले उघड

    Rajnath Singh : ‘आम्ही घरात घुसून त्यांना मारले…’, राजनाथ सिंह यांनी केले सैन्याचे कौतुक

    SIA raids : दहशतवादाशी संबंधित प्रकरणी SIAचे जम्मू अन् काश्मीरच्या शोपियानमध्ये छापे