• Download App
    बंगालचे लोण राजस्थानमध्येही, राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या खासदारांवर हल्ला|Attack on BJP MP who accused of hiding corona figures by state government

    बंगालचे लोण राजस्थानमध्येही, राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या खासदारांवर हल्ला

    विरोधकांवर हल्ले करून त्यांचे तोंड गप्प करण्याचे पश्चिम बंगालचे लोण राजस्थानातही पोहोचले आहे. राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजीता कोली यांच्या मोटारीवर गुंंडांनी हल्ला केला.Attack on BJP MP who accused of hiding corona figures by state government


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : विरोधकांवर हल्ले करून त्यांचे तोंड गप्प करण्याचे पश्चिम बंगालचे लोण राजस्थानातही पोहोचले आहे. राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजीता कोली यांच्या मोटारीवर गुंंडांनी हल्ला केला.

    रंजीता कोली या एका सामूहिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यासाठी करण्यासाठी गेलेल्या होत्या. धरसोनी गावात अज्ञात गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामध्ये खासदाराच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत.



    रंजीता कोली यांना दुखापत झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी रंजीता कोली यांनी कोरोना आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता.

    त्यामुळे कॉँग्रेसच्या गुंडांकडून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा हल्ला खूप भयंकर होता. हल्यानंतर खासदार बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर तातडीने कळविल्यावरही पोलीस लवकर घटनास्थळी पोहोचले नाहीत.

    खासदारांच्या सोबत असलेल्यांनी भरतपूर येथील जिल्हाधिकाºयांनाही वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. खासदार रंजीता कोली यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिले होते. भरतपूर मतदारसंघात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी होत आहे.

    चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या किती आहे हे समजत नाही. दिवसाला किमान ५ हजार आरटीपीसीआर चाचणी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यासोबत भरतपूर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी लपवू नका असेही म्हटले होते.

    Attack on BJP MP who accused of hiding corona figures by state government

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही