• Download App
    काँग्रेसनेच हिंदुत्ववादाला खतपाणी घातलेय; असदुद्दीन ओवैसी यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र Asaduddin Owaisi takes on Rahul Gandhi over the issue of Hindutva

    काँग्रेसनेच हिंदुत्ववादाला खतपाणी घातलेय; असदुद्दीन ओवैसी यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई विरोधातील जयपूरच्या रॅलीत हिंदुत्ववाद यांवर टीकेचे आसूड ओढले, पण त्याच वेळी त्यांनी देशात हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे वक्तव्य केले. त्यावर चिडून जाऊन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत ओवैसी यांनी काँग्रेसला हिंदुत्ववाद्यांच्या मुद्द्यावर घेरले आहे.Asaduddin Owaisi takes on Rahul Gandhi over the issue of Hindutva

    आत्तापर्यंत काँग्रेसनेच हिंदुत्ववादाला खतपाणी घातले आहे आणि आता त्यांचे नेते राहुल गांधी हे बहुसंख्यांकचे राजकारण करू इच्छित आहेत. हीच का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता?, असा परखड सवाल ओवैसी यांनी केला आहे.


    काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीत गांधी परिवाराचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल; दीर्घकाळानंतर सोनिया गांधी सार्वजनिक मंचावर!!


    काँग्रेस आत्तापर्यंत धर्मनिरपेक्षतेचे ढोल वाजवत सत्तेवर येत होती. पण आता सत्ता गेल्यानंतर त्यांनी देखील भाजपचाच पावलावर पाऊल टाकत हिंदूवादाचा पुरस्कार केला आहे, अशी टीका देखील ओवैसी यांनी केली आहे.

    राहुल गांधींनी जयपूरमधील भाषणात हिंदू आणि हिंदुत्ववाद यांच्यात भेद असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून समर्थनाचे आणि टीकेचे सूर उमटत आहेत. यातलाच एक टीकेचा विश्व हिंदू परिषदेने देखील काढला आहे. राहुल गांधी हे भारतीय राजकारणातले सगळ्यात भ्रमिष्ट नेते आहेत. त्यांना हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही माहिती नाही. महात्मा गांधींचे ग्रंथही त्यांनी वाचले नाहीत. स्वराज्य म्हणजे रामराज्य असे स्वतः गांधीजींनीच म्हणून ठेवले आहे. पण ते देखील त्यांनी वाचलेले नाही असे टीकास्त्र विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी सोडले आहे, तर असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर हिंदूत्ववादाला खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे.

    Asaduddin Owaisi takes on Rahul Gandhi over the issue of Hindutva

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!