वृत्तसंस्था
कामारेड्डी : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दलित समाजातील लोकांच्या धर्मांतरासंदर्भात परखड बोल सुनावले आहेत. दलित समाजातील व्यक्तींचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असेल त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवले पाहिजे कारण आपण त्यांचे संरक्षण करण्यास कमी पडत आहोत, असे मत राव यांनी व्यक्त केले आहे. दलितांना जो सन्मान दिला जात नाही तो त्यांना धर्मांतर केल्यावर मिळतो, असे राव म्हणाले. ते कामारेड्डी येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. As Hindu society lacks respect for Dalits, they convert to Christianity; Speak of Chandrasekhar Rao
ते म्हणाले, “जर दलित सामाजातील लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत असतील तर त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवले पाहिजे कारण आपल्याला त्यांचं संरक्षण करता आले नाही. जेव्हा हे लोक धर्मांतर करतात तेव्हा त्यांना तो मान दिला जातो जो दलित असल्याने आपण त्यांना देत नाही. मी स्वत: हिंदू आहे. मात्र दलितांना आजही गरिबीला तोंड देत अनेक संकटांचा समाना करावा लागतोय, हे पाहून मला फार दु:ख होते.”
आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन गरीब आणि दलितांना मदत करुन त्यांना या गरिबीमधून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही राव यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांवरही हल्लाबोल
माध्यमं करोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असा आरोपही राव यांनी सोमवारी वारंगल येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केला होता. प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्यांना महत्व देत असल्याचा आरोप करतानाच राव यांनी आपण पॅरासिटामॉल आणि अॅण्डीबॉडीज वाढवण्याच्या गोळ्या खाऊन दोन दिवसात करोनावर मात केल्याचे सांगितले. माध्यमे लोकांना घाबरवत आहेत. अशा प्रकारे विनाकारण भीती पसरवण्याची काय गरज आहे?, असा प्रश्नही राव यांनी उपस्थित केला.
As Hindu society lacks respect for Dalits, they convert to Christianity; Speak of Chandrasekhar Rao
महत्त्वाच्या बातम्या
- ALERT : Delta variant अमेरिकेसाठी धोक्याची घंटा ; डॉ. फाऊची यांचा दावा ; जाणून घ्या सविस्तर
- दु : खद मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर ! उंदराने डोळे कुरतडलेल्या राजवाडी हॉस्पिटल मधील 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
- लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, फायजर लसीला परवानगी, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती
- मोदी सरकार देणार कामगारांना भेट, अर्जित सुट्यांची संख्या होणार ३००, नव्या कामगार कायद्याबाबत बैठक
- भारताचे गुंतवणूक गुरू राकेश झुनझुनवाला म्हणतात, पैंज लावा कोरोनाची तिसरी लाट येणार नाही
- केंद्र सरकार करणार खर्चात काटकसर, हवाई प्रवास, बैठकांतील चहा, नाष्टयाचा खर्च होणार कमी
- नीरव मोदीला भारतात आणणारच, ब्रिटन न्यायालयाने प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळली