• Download App
    दु:खद : मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर ! उंदराने डोळे कुरतडलेल्या राजवाडी हॉस्पिटल मधील 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। Tragic: Mumbai Municipal Corporation's affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being bitten by a rat

    दु:खद : मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर ! उंदराने डोळे कुरतडलेल्या राजवाडी हॉस्पिटल मधील 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

    BMC वर स्थानिकांकडून संताप, रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नाही. Municipal Corporation’s affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being bitten by a rat


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईच्या घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. श्रीनिवास यलप्पा ( वय 24 वर्ष) असं या रुग्णाचं नाव असून या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.हे धक्कादायक आहे .



    मुंबई सारख्या ठिकाणी एका नामांकित रूग्णालयात काही दिवसांपूर्वी श्रीनिवास राजावाडी रुग्णालयात दाखल झाला होता. दम लागत असल्यामुळे श्रीनिवासच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय तपासणी केली असता श्रीनिवासला लिव्हरचा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. श्रीनिवासच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. Tragic: Mumbai

    परंतू या निमीत्ताने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील स्वच्छतेचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. आज सकाळी राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात साचलेला कचराही साफ करण्यात आला. परंतू ICU सारख्या ठिकाणी उंदराने प्रवेश करुन रुग्णाचा डोळा कुरतडल्यामुळे महापालिकेच्या कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

    Tragic: Mumbai Municipal Corporation’s affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being bitten by a rat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

    तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?