विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Amit Satam पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास ५० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत.MLA Amit Satam
आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापालिकेचे सभागृह नेते गणेश खनकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी, महापालिका उपायुक्त, स्थानिक वॉर्ड अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.MLA Amit Satam
मुंबईकरांना आगामी पावसाळ्यात कमीत कमी त्रास व्हावा आणि ३१ मेपर्यंत १००% नाला सफाईचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने ही पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुमारे ४०–५०% नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी नद्या आणि नाले समुद्राला मिळतात, त्या सर्व ठिकाणी कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी ट्रॅश बूम बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि आमदार वेगवेगळ्या वेळी विविध ठिकाणी पाहणी करत असल्याचेही साटम यांनी सांगितले.
Approximately 50% of drain cleaning work completed; BMC directed to finish the work by May 31 – Mumbai BJP President and MLA Amit Satam
महत्वाच्या बातम्या
- Drone Force : भारत- पहिल्यांदाच 50 हजार जवानांची स्वतंत्र ड्रोन फोर्स; बीएसएफ व आयटीबीपीमध्येही असेल, सर्वात आधी हेच हल्ला करतील
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी; जुन्या ममता शिष्यावरच ममतांच्या राजवटीतले गदळ दूर करायची जबाबदारी!!
- Indian Railways : वेटिंग तिकीट निश्चित होईल की नाही, AI सांगणार; रेल्वे 40 वर्षांपूर्वीच्या आरक्षण प्रणालीत बदल करणार
- Odisha : ओडिशा येथे जीआरपी कॉन्स्टेबलची मारहाण करून हत्या; छेडछाडीच्या आरोपावरून गर्दीने मारले