नाशिक : हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले. Mamata + Stalin
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आणि त्यांची राजकीय वैशिष्ट्ये जरी वेगवेगळी असली, तरी एक बाब अतिशय ठळक पणे अधोरेखित झाली, ती म्हणजे सनातन धर्माला आणि हिंदू समाजाला शिव्या घालून तुम्ही भारतात कुठेही राज्य करू शकत नाही. मतदार तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहात नाही. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये हे राजकीय सत्य सिद्ध झाले.
ममतांचा मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींनी मुसलमानांचे एवढे लांगूलचालन केले की त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला आपल्यापासून दूर लोटले. दिल में काबा, आखों में मदिना म्हणून ममतांनी मुस्लिम वोट बँक मजबूत केली. त्या फक्त मुस्लिम वोट बँकेवर अवलंबून राहिल्या, पण त्याचा परिणाम म्हणून हिंदू लोक बँक त्यांच्या विरोधात गेली. मोदी + शाहांनी हिंदू वोट बँकला फक्त हवा दिली. त्या दोघांनी हिंदू वोट बँक क्रिएट नाही केली. ती ममतांच्या अतिरेकी मुस्लिम तुष्टीकरणामुळे तयार झाली. तिला फक्त मोदी + शाहांनी फक्त आकार दिला. हिंदू वोट बँकचा फायदा घेता येईल एवढा भाजप तिथे मजबूत करून ठेवला. बाकी मोदी आणि शाह यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला, हे राजकीय असत्य आहे.
तामिळनाडूत मोठा उलटफेर
पण सनातन धर्माला शिव्या दिल्याचा आणि हिंदू समाजाला दूर लोकांचा खरा परिणाम तामिळनाडू दिसला. तामिळनाडूत हिंदुत्वाचे राजकीय वातावरण अजिबात नव्हते. तशी वातावरण निर्मिती करण्याची भाजपमध्ये क्षमता देखील नव्हती. मोदी आणि शाह यांनी जेवढ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल मध्ये कॉन्सन्ट्रेट केले होते, तेवढे तामिळनाडू बिलकुल कॉन्सन्ट्रेट केले नव्हते, तरीसुद्धा सनातन धर्माला शिव्या घातल्याचा आणि हिंदू समाजाला दूर लोटण्याचा परिणाम तामिळनाडूत एम. के. स्टालिन आणि उदयनिधी स्टालिन यांना भोगावा लागला. तमिळ जनतेने त्यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघमला तिसऱ्या नंबर वर फेकून दिले.
विजयने जपली प्रतिमा
तामिळनाडू भाजपने सक्षम पर्याय उभा केला नसल्याचा परिणाम अभिनेता विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला मिळाला. अभिनेता विजय हा स्वतः ख्रिश्चन असून तो निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उगाच सनातन धर्माला शिव्या देत बसला नाही. त्याने चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केल्या. मुस्लिम लोकांना आपल्या जवळ केले, पण आपण हिंदुत्वाच्या विरोधात आहोत किंवा हिंदू समाजाच्या विरोधात आहोत, सनातन धर्माच्या विरोधात आहोत, असे चित्र निर्माण होऊ दिले नाही. उलट त्याने तामिळनाडू मधल्या काही मंदिरांना सुद्धा भेटी देऊन दर्शने घेतली. निवडणूक मतदान संपल्यानंतर अभिनेता विजय शिर्डीला सुद्धा येऊन गेला. तिथे त्याने साईबाबांचे दर्शन घेतले. विजयाने स्वतःची धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपली.
स्टालिन पिता पुत्राला तडाखा
त्या उलट एम. के. स्टालिन, उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माला शिव्या दिल्या. त्यांनी सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, एड्स असला रोग आहे. या रोगांचे उच्चाटन केले, तसे सनातन धर्माचे उच्चाटन केले पाहिजे, असे गरळ ओकले म्हणून तामिळनाडूतल्या जनतेने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकून जोरदार तडाखा दिला.
सनातन धर्माला शिव्या देणारे पक्ष पराभूत
या सगळ्याचा अर्थ हाच की भारतात आता कुठल्याच राज्यात सनातन धर्माला शिव्या देऊन किंवा हिंदू समाजाला दूर लोटून कुठला पक्ष राज्य करू शकणार नाही. मतदार त्या पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, हे सिद्ध झाले. आत्तापर्यंत भाजपला काऊ बेल्ट मधला पक्ष म्हणून विचारवंतांनी हिणवले होते, पण भाजप बंगालमध्ये पोहोचला. त्यापलीकडे आसाम मध्ये पोहोचला. तो अजून तामिळनाडू दाखल झाला नाही, पण म्हणून हिंदुत्वाचा राजकीय विचार मर्यादित राहिला, असे घडले नाही. उलट तो विचार भारतात सर्व दूर पोहोचल्याचे या निवडणुकांनी सिद्ध केले. जिथे भाजपने सक्षम राजकीय पर्याय उभा केला, तिथे त्या पक्षाला राजकीय लाभ मिळाला, जिथे भाजपने सक्षम पर्याय उभा केला नाही, तिथे अन्य पक्षाला लाभ मिळाला. पण सनातन धर्माला शिव्या देणारे आणि हिंदू समाजाला दूर लोटणारे पक्ष मात्र दणकून पराभूत झाले.
Anti sanatan – anti hindutva forces defeated in west bengal and tamilnadu
महत्वाच्या बातम्या
- Israeli : इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; कॅथोलिक कॉन्व्हेंट उद्ध्वस्त, 7 जणांचा मृत्यू.
- नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय
- Iran war : इराण युद्धाला 2 महिने, जगात महागाई वाढली; ₹94.91 लाख कोटी खर्च; ट्रम्प यांची लोकप्रियता घटली
- नसरापूर अत्याचार प्रकरणाला काही लोकांकडून वेगळे वळण; देवेंद्र फडणवीसांनी ठेवले वर्मावर बोट!!
Graveyard : इराणने म्हटले- होर्मुझला अमेरिकी सैन्याची स्मशानभूमी बनवून टाकू; अमेरिकी जहाजांचीही तीच गत होईल