वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानात पब्जी खेळाचा आणखी एक बळी गेला. जयपूरमध्ये एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. वाढदिवसानिमित्त तिला PUBG खेळण्यासाठी नवा मोबाईल दिला नाही म्हणून तिने गळफास लावून घेतला. Another victim of Pubji game in Rajasthan; Suicide of a young woman for not giving her a mobile phone for her birthday
जयपूरचे पोलिस अधीक्षक राज कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने १३ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने PUBG खेळण्यासाठी तिच्या पालकांकडे मोबाईल फोन मागितला. मात्र, पालकांनी फोन बारावीची परीक्षा संपल्यानंतर घेऊ असे सांगितले.
गुप्ता म्हणाले की, या गोष्टीमुळे मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधील रामनगर मेट्रो स्टेशनच्या रेलिंगवरून ३० वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या केली होती. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या भारती नावाच्या मुलीने शुक्रवारी रात्री मेट्रो स्टेशनच्या रेलिंगवरून खाली उडी मारली. गंभीर अवस्थेत तिला एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला.
Another victim of Pubji game in Rajasthan; Suicide of a young woman for not giving her a mobile phone for her birthday
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात मराठी भाषा भवन उभारण्याच्या प्रतीक्षेत; उर्दू घरांवर मात्र कोट्यवधींची तरतूद आणि अनुदानाची खैरात!!
- शिवनेरीवर अजितदादांच्या शिवजयंतीच्या भाषणात मराठा आरक्षणावरून अडथळा; अजितदादांनी तरुणाला सुनावले…
- बिहारमध्ये रिकाम्या ट्रेनमध्ये आगीचा भडका; जीवितहानी नाही; रेल्वे कर्मचारी धावले
- छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे स्वाभिमान : संजय राऊत