• Download App
    पब्जी गेम खेळण्याच्या नादात बारावीतील मुलीने केली आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील प्रकार । Twelth standard girl commits suicide while playing pubji game

    पब्जी गेम खेळण्याच्या नादात बारावीतील मुलीने केली आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील प्रकार

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात बारावीत शिक्षण घेणाऱ्या नम्रता पद्माकर खोडके या 16 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात आत्महत्या केली. नम्रताने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला. Twelth standard girl commits suicide while playing pubji game


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात बारावीत शिक्षण घेणाऱ्या नम्रता पद्माकर खोडके या 16 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात आत्महत्या केली. नम्रताने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला.

    पब्जी खेळातील एका स्टेपवर नम्रताने आत्महत्या केली. तिचे वडील सहाय्यक डॉक्टर म्हणून काम करतात. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून आई घराच्या बांधकामावर पाणी मारायला गेली असताना नम्रताने आत्महत्या केली.नम्रता येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तिला मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याचा नाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.



    तिने लिहिलेली चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नये असे तिने सुसाईडनोट मध्ये इंग्रजीत लिहिले आहे. जप्त केलेला मोबाईल फेस लॉक असल्याने पोलिसांनी तिच्या चेहऱ्यासमोर नेत तो उघडला. मोबाईलमध्ये पब्जी गेम संबंधीत स्क्रिनशॉट होता.

    Twelth standard girl commits suicide while playing pubji game

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Abhijit Deepke : दीपके म्हणाले- विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तत्काळ थांबवा; नाहीतर मोठे आंदोलन होईल, CJP चा दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा

    Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

    Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण; कोर्ट SITच्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप