राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं सूचक विधान
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – Doomsday Plane इराणवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या शक्यतेच्या दरम्यान, वॉशिंग्टन डीसीमधून ‘डूम्सडे प्लेन’ झेपावल्याचे दिसले . इस्रायल-इराण संघर्षादरम्यान, हे मोठ्या हल्ल्याचे संकेत देत आहेत. वॉशिंग्टन डीसी जॉइंट बेस अँड्र्यूजवरून उडणाऱ्या डूम्सडे विमानांवरून खळबळ उडाली. अमेरिकेचे ई-4बी नाईटवॉच विमान ‘डूम्सडे प्लेन’ म्हणून ओळखले जाते. मंगळवारी लुईझियानाहून अमेरिकेतील मेरीलँड येथे हे विमान उडवले गेले. Doomsday Plane
या विमानात अणुस्फोट, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरव्हेशन सहन करण्याची क्षमता आहे. गरज पडल्यास ते प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यासाठी समन्वय साधू शकतं. एवढंच नाहीतर त्यावर अणुहल्ला जरी झाला तरी तो कुचकामी आहे. त्यात शत्रू देशावर हल्ला करण्याची शक्ती आहे. वॉशिंग्टनमध्ये हे विमान अचानक दिसल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहेत याचा अंदाज लावता येतो. तथापि ई-4बी विमाने नियमित सराव उड्डाणांसाठी वापरली जातात.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना माध्यमांनी नुकतंच विचारलं होतं की, ते इराणवर हल्ला करतील का, ज्यावर त्यांचे उत्तर होते की ते होऊ शकते आणि कदाचित होणारही नाही. अशा परिस्थितीत इराणवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. वॉशिंग्टन डीसीमधील जॉइंट बेस अँड्र्यूजवरून अमेरिकेचे ‘डूम्सडे प्लेन’ उडताना दिसल्यानंतर अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. असे दिसते की अमेरिका मोठ्या युद्धाची तयारी करत आहे.
याला ई-4बी नाईटवॉच किंवा ‘डूम्सडे प्लेन’ असे म्हणतात. हे विमान संकटाच्या परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष, संरक्षण सचिव आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफसाठी एअरबोर्न कमांड सेंटर म्हणून काम करते. ते त्यांना सुरक्षित संवाद आणि समन्वय राखण्यास मदत करते.
America make major preparations for a nuclear attack Doomsday Plane takk off from Washington
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे इराण-इस्रायल युद्ध, दुसरीकडे झेलेन्स्कीने घेतला मोठा निर्णय
- पाकिस्तान विरुद्ध Operation Sindoor, इराण मधून भारतीयांच्या सुटकेसाठी Operation Sindhu सुरू!!
- Chhattisgarh : छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमकीत तीन मोठे नक्षलवादी नेते ठार
- ED raids : दिल्लीत EDची ३७ ठिकाणी छापेमारी; जाणून घ्या, काय आहे प्रकरण?