विशेष प्रतिनिधी
मुंबई : ब्रिटनने सर्व विदेशींसाठीचे कोरोना नियम रद्द केले आहेत. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आयसोलेट होण्याची गरज नाही. त्यांना आता मास्कचीही गरज नाही, असे ट्विट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने केले आहे. महाराष्ट्रातही सर्व निर्बंध रद्द करण्याची तयारी करण्यात आली आह. कोरोना व्यवस्थापन समितीच्या बैेठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.All corona restrictions including mask lifted, decision in UK, preparations in Maharashtra also started
ब्रिटनमध्ये यापूर्वी मास्क आवश्यक होता व घराबाहेर जाणाऱ्यांसाठी कोरोना पासची गरज होती. हे नियम २४ फेब्रुवारीपासून रद्द करण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, देशात होणाऱ्या कोरोनाच्या मोफत चाचण्या १ एप्रिल २०२२ पासून बंद होणार आहेत. चाचण्यांसाठी नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर बाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे.
मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने सादरीकरण केले. राज्यातील निर्बंध हटविताना संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाणार आहेत.
संबंधित जिल्हा प्रशासन आपल्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेईल. हॉटेल, चित्रपटगृहे, जीम, स्पामध्ये ५० टक्के उपस्थितीची मयार्दा सध्या आहे. ती पूर्णत: हटविली जाईल, अशी शक्यता आहे. विवाह समारंभासाठी असलेली २०० लोकांच्या उपस्थितीची अट शिथिल केली जाईल वा पूर्णत: उठविली जावू शकते. मुख्यमंत्री व टास्कफोर्सशी चर्चा करून त्या बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
All corona restrictions including mask lifted, decision in UK, preparations in Maharashtra also started
महत्त्वाच्या बातम्या
- डॅनीने नाकारला होता ‘शोले’ मधील गब्बर
- आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी
- Shivsena – BJP alliance : शिवसेना-भाजप युती होणार का??; उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसैनिकांना लढण्यासाठी वाट मोकळी केली पाहिजे!!
- राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची निती आयोगाकडून पुन्हा एकदा दखल
- औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह बंदच विद्यार्थ्यांची गैरसोय; तात्काळ सुरु करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी