परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ट्विटरवर नाहीत.AJIT DOBHAL: If you are also following Ajit Doval, beware; Alert issued by MEA
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सावधान! जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल ; कारण NSA डोभाल यांचे ट्विटर हॅंडल नाही. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ट्विटरवर नाहीत.
तेथे त्यांच्या नावाने जे अकाऊंट सुरू आहेत. ते सर्व बनावट आहेत. अशातच त्यांच्या नावाने सुरू असलेल्या बनावट अकाऊंटपासून नेटकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला देखील बागची यांनी दिला आहे.
ते म्हणाले की , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपल्या कार्यशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना लाइमलाइटमध्ये राहण्याची हौस नाही. त्यांच्या जबाबदार स्वभावामुळे ते नको तिथे वक्तव्य करीत नाहीत. त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचे भारतीय चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या बनावट अकाऊंटवर फॉलोवर्सची संख्या देखील अधिक आहे.
AJIT DOBHAL: If you are also following Ajit Doval, beware; Alert issued by MEA
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल