• Download App
    शरद पवारांना अंधारात ठेवूनच अजितदादांचे बंड; सुप्रिया सुळेंचा पुन्हा दावा|Ajit Dada's rebellion by keeping Sharad Pawar in the dark; Reclaimed by Supriya Sule

    शरद पवारांना अंधारात ठेवूनच अजितदादांचे बंड; सुप्रिया सुळेंचा पुन्हा दावा

    वृत्तसंस्था

    पुणे : खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची??, शरद पवारांची की अजित पवारांची??, हा वाद निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अंतिम टप्प्यात आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे. शरद पवारांना अंधारात ठेवूनच अजित दादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड केले याची कबुली त्यांनी स्वतःच वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर दिली, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.Ajit Dada’s rebellion by keeping Sharad Pawar in the dark; Reclaimed by Supriya Sule

    आपल्याला बंड का आणि कोणत्या परिस्थितीत करावी लागले??, याचा तपशीलवार खुलासा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जुलै 2023 रोजी घेतलेल्या मेळाव्यात केला होता. शरद पवार वारंवार आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायला पाठवायचे. स्वतः अतिवरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायचे आणि आयत्या वेळेला माघार घ्यायचे, असे दोन-तीन वेळा घडले. त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा लागला असे अजित पवारांनी स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना अजितदादांनी अंधारात ठेवल्याचा दावा केला होता. तोच दावा काल पुन्हा एकदा केला.



    खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार अपात्रतेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

     सुप्रिया सुळे म्हणाल्या :

    खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले हे मला माहिती नाही. हे मला आता तुमच्याकडूनच कळत आहे. राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंदना चव्हाण, फौजिया खान आणि प्रफुल्ल पटेल हे आहेत. जेव्हा मणिपूरवर चर्चा झाली, मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तेव्हा मतदानाची वेळ आली, किंवा चर्चेत भाग घ्यायची वेळ आली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी भाजप, ज्यांची मणिपूरमध्ये सत्ता आहे, त्यांची बाजू घेतली.

    जिथे बलात्कार झाले, लोकांची घरे जाळली गेली, अशा अनेक गोष्टी झाल्या, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. या भारतात कुठल्याही महिलेचा बलात्कार होत असेल, जरी आम्ही सत्तेत असलो तरी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. या चुकीच्या गोष्टींच्या बाजूने आम्ही मतदान करणार नाहीत. राजकारण असलं तरी काही तत्वाच्या गोष्टी देखील असतात. प्रफुल्ल पटेल यांची भूमिका पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं आणि दु:ख झालं की, प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला सहकार्य केले.

    भाजपशी आमची वैचारिक लढाई आहे. प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने निर्णय घेत असतील म्हणून आम्ही त्यांना जुलै महिन्यातच अपात्र केले आहे. केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेतात तेव्हा प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने मतदानाचा निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची पुन्हा मागणी केली आहे.

    पवारांना अंधारात ठेवून शपथविधी

    लोकसभेत मी स्वत:, अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. कारण अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आहे. हे तुमच्या चॅनलवरचे रेकॉर्ड गोष्ट आहे. पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना एवढा मोठा निर्णय घेता तर अर्थात अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

    Ajit Dada’s rebellion by keeping Sharad Pawar in the dark; Reclaimed by Supriya Sule

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!