• Download App
    एअरबस कडून भारत ५६ लष्करी वाहतूक विमाने खरेदी करणार, तब्बल २० हजार कोटींचा करार |AIRBUS will provide aircrafts to India

    एअरबस कडून भारत ५६ लष्करी वाहतूक विमाने खरेदी करणार, तब्बल २० हजार कोटींचा करार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – केंद्र सरकारने ‘सी-२९५’ ही ५६ लष्करी मालवाहू विमाने खरेदी करण्यासाठी स्पेनच्या ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ या कंपनीसोबत २० हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.AIRBUS will provide aircrafts to India

    देशातील लष्करासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू विमानांच्या निर्मितीची जबाबदारी एखाद्या खासगी कंपनीकडे सोपविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या करारानुसार एअरबस कंपनीकडून देण्यात येणारी पहिली सोळा विमाने ही थेट उड्डाणास सज्ज असतील.



    या विमानांची शेवटच्या टप्प्यातील जुळवणी ही स्पेनमधील सेव्हिले येथे करण्यात येईल. यानंतर चाळीस विमानांची निर्मिती आणि जुळवणी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपनीकडून करण्यात येईल. या करारानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एअरबस डिफेन्सचे स्वागत केले आहे. देशातच उड्डाण प्रकल्प सुरू करण्याच्या अनुषंगाने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    AIRBUS will provide aircrafts to India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा