विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने ‘सी-२९५’ ही ५६ लष्करी मालवाहू विमाने खरेदी करण्यासाठी स्पेनच्या ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ या कंपनीसोबत २० हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.AIRBUS will provide aircrafts to India
देशातील लष्करासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू विमानांच्या निर्मितीची जबाबदारी एखाद्या खासगी कंपनीकडे सोपविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या करारानुसार एअरबस कंपनीकडून देण्यात येणारी पहिली सोळा विमाने ही थेट उड्डाणास सज्ज असतील.
या विमानांची शेवटच्या टप्प्यातील जुळवणी ही स्पेनमधील सेव्हिले येथे करण्यात येईल. यानंतर चाळीस विमानांची निर्मिती आणि जुळवणी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपनीकडून करण्यात येईल. या करारानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एअरबस डिफेन्सचे स्वागत केले आहे. देशातच उड्डाण प्रकल्प सुरू करण्याच्या अनुषंगाने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
AIRBUS will provide aircrafts to India
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला , २२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सुरू होतील चित्रपटगृहे
- HCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, फ्रेशर्स इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी भरती
- WATCH :आरोग्य विभाग अन् मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे – खा. नवनीत राणा
- WATCH : चित्रपटगृह चालक आनंदी, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत