• Download App
    राहुल गांधींनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे डिजिटल चॅनेल 'INC TV'चे अकाउंट केले ब्लॉक, नियमांच्या उल्लंघनाचा हवाला । After Rahul Gandhi Now Congress inc tv twitter account has been locked for violating norms

    राहुल गांधींनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे ‘INC TV’चे अकाउंट केले ब्लॉक, नियमांच्या उल्लंघनाचा दिला हवाला

    Congress inc tv twitter account : ट्विटरने काँग्रेसचे डिजिटल चॅनल ‘INC TV’चे खाते तात्पुरते लॉक केले आहे. ट्विटरने म्हटले की, INC TVने त्यांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी काँग्रेसने दावा केला होता की, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, परंतु मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने “खाते अजूनही सेवेत आहे” असे सांगून हा दावा खोडून काढला. यानंतर काँग्रेसने म्हटले होते की, पक्षाच्या माजी अध्यक्षांचे खाते तात्पुरते ‘लॉक’ करण्यात आले आहे. After Rahul Gandhi Now Congress inc tv twitter account has been locked for violating norms


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ट्विटरने काँग्रेसचे डिजिटल चॅनल ‘INC TV’चे खाते तात्पुरते लॉक केले आहे. ट्विटरने म्हटले की, INC TVने त्यांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी काँग्रेसने दावा केला होता की, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, परंतु मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने “खाते अजूनही सेवेत आहे” असे सांगून हा दावा खोडून काढला. यानंतर काँग्रेसने म्हटले होते की, पक्षाच्या माजी अध्यक्षांचे खाते तात्पुरते ‘लॉक’ करण्यात आले आहे.

    लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी शनिवारपासून ट्विटरवर कोणतीही पोस्ट केलेली नाही. सोमवारी युवक काँग्रेसच्या (आयवायसी) कार्यकर्त्यांनीही राहुल गांधी यांचे खाते पूर्ववत करण्यासाठी दिल्लीतील ट्विटर कार्यालयासमोर निदर्शने केली. युवक काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला की, राहुल गांधींचे ट्विटर खाते कोणाच्या इशाऱ्यावर लॉक करण्यात आले आहे?

    “राहुल गांधी ट्विट करू शकले नाहीत”

    काँग्रेसने शनिवारी संध्याकाळी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, “राहुल गांधी यांचे खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे आणि त्याच्या बहालीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत खाते पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत तो सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्याशी जोडलेले राहतील आणि लोकांसाठी आवाज उठवत राहतील आणि त्यांची लढाई लढत राहतील. जय हिंद.”

    यावर ट्विटरने म्हटले आहे की, जर एखादे खाते निलंबित केले तर लोक ते पाहू शकत नाहीत. नंतर आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, “खाते तात्पुरते लॉक करण्यात आले आहे.” पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधींच्या खात्यावर ज्या स्तरावरून कारवाई करण्यात आली आहे, त्यानुसार ते त्यांच्या खात्यात लॉगिन करू शकतात, परंतु ट्विट, रिट्विट करू शकत नाहीत आणि कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ शेअर करू शकत नाहीत.

    After Rahul Gandhi Now Congress inc tv twitter account has been locked for violating norms

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!