नाशिक : ममता, उद्धव नंतर अखिलेशचा नंबर; पण शरद पवारांचे आठ खासदार बसणार हात चोळत!!, असेच राजकीय अवस्था दिल्लीत दिसून येतेय.
– तृणमूलचे २० फुटीर खासदार भाजपच्या गोटात
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला. त्यांच्या निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 59 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. ते स्वतःलाच तृणमूळ काँग्रेस म्हणायला लागले. त्यांची ममता बॅनर्जींबरोबर कायदेशीर लढाई सुरू झाली. त्यांच्या पाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या 29 खासदारांपैकी 20 खासदार फुटले त्यांनी सुरुवातीला स्वतंत्र गट स्थापन केला आणि नंतर ते नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया मध्ये विलीन झाले.
– शिवसेना उबाठा फुटली
त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार फुटले. त्यांनी लोकसभा अध्यक्षांना तसे पत्र दिले लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिल्याची बातमी आली. त्याबरोबर संजय राऊत यांनी फुटीर खासदारांच्या नावाने ते साले भोसडीचे…, अशी शिवीगाळ केली. वास्तविक उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची भाजपच्या सत्तेत “सोय” लावून दिली. कारण या खासदारांना देण्यासारखे उद्धव ठाकरेंकडे काही उरले नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक कारवाईमध्ये दिरंगाई केली. या दिरंगाईचा फुटीर खासदार लाभ उठवतील, अशी सुद्धा “सोय” करून दिली. पण त्यानंतर संजय राऊत यांनी फुटीर खासदारांच्या नावाने शिवीगाळ केली.
– अखिलेशची समाजवादी पार्टी फुटायची शक्यता
याच दरम्यान ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फुटल्यानंतर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष फुटेल, अशी चर्चा दिल्ली आणि लखनऊमध्ये सुरू झाली. उत्तर प्रदेश मधले योगी सरकार मधले मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात फूट पडण्याची मशाल पेटवली. उत्तर प्रदेशातल्या खाण घोटाळ्यामध्ये, गोमती रिवर फ्रंट घोटाळ्यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अडकलेत. त्यांच्याभोवती चौकशी आणि तपासाचे खोडे अडकवले गेलेत. त्यामुळे लवकरच समाजवादी पक्ष फुटून तो अख्खाच्या अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होईल. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे घडून येईल. समाजवादी पक्षात फक्त अखिलेश यादव आणि त्यांचे कुटुंबीयच उरतील, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने फुटले ते पाहता ओम प्रकाश राजभर यांचे भाकीत खरे ठरण्यासाठी काहीच दिवस उरले असल्याचा सत्याभास निर्माण झाला.
– सत्ताधारी NDA मध्ये 26 खासदारांची भर
ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची पक्ष फुटून त्यांचे खासदार बाहेर पडून केंद्रातली भाजप सत्ता संख्याबळाच्या आधारे मजबूत झाली. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत 20 + 6 अशी 26 खासदारांची भर पडली. त्या पाठोपाठ अखिलेश यादव यांच्या 35 खासदारांमध्ये सुद्धा चलबिचल सुरू झाली.
– राष्ट्रवादीच्या गोटात नुसतीच खळबळ
एवढे सगळे घडत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या गोटात म्हणे, खळबळ उडाली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे, अलर्ट वर आली. त्यांनी आपल्या खासदारांची तातडीची म्हणे बैठक बोलावली. पण या बातम्या फक्त मराठी माध्यमांमध्ये आल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून फक्त रोहित पवारांनी आदळआपट करणारी ट्विट केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांपैकी नेमके किती खासदार फुटतील या संदर्भात कुणी कुठले भाकीतच केले नाही. त्या खासदारांची यादी कुठल्या माध्यमांनी प्रसिद्ध केली नाही. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी तर शरद पवारांच्या आठ खासदारांच्या बळाला हिंग लावून सुद्धा विचारले नाही.
– शरद पवारांना कुणी विचारेच ना!!
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ममता बॅनर्जींच्या पक्षातून फुटलेल्या २० खासदारांना आपल्या सत्तेच्या वळचणीला आणून बसविले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या सहा खासदारांची राजकीय बेगमी केली. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष फुटण्याची बातमी सुद्धा भाजपच्याच मित्र पक्षांच्या गोटातून सुटली. पण शरद पवारांच्या आठ खासदारांचे बळ असलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल मराठी माध्यमे वगळून बाकी कुठल्याही गोटातून बातम्याच आल्या नाहीत. शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी या कुठल्याच फुटीची दखल घेणारी ट्विट केली नाहीत. फक्त रोहित पवारांनी आदळआपट करणारी दोन ट्विट केली. त्यामुळे शरद पवारांच्या आठ खासदारांना अजूनही सत्तेच्या प्रतीक्षेत राहून हात चोळत बसावे लागण्याची चिन्हे दिसली.
After Mamata and Uddhav, it is Akhilesh’s turn.
महत्वाच्या बातम्या
- jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली
- Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला
- RSS : नोंदणीच्या राजकीय वादात आयकर विभागाने आणि न्यायालयाने कोणते निर्णय दिले होते??; वाचा सविस्तर!!
- महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!