• Download App
    राहूल गांधींवर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड, ममता बॅनर्जींवर केला हुकुमशाही मानसिकतेचा आरोप|After criticism on Rahul Gandhi, congress accuses Mamata Banerjee of dictatorial mentality

    राहूल गांधींवर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड, ममता बॅनर्जींवर केला हुकुमशाही मानसिकतेचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉँग्रेसेचे नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेस यांच्यातच आता जुंपली आहे. ममता बॅनर्जी यांची मानसिकता हुकुमशाहीची असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे.After criticism on Rahul Gandhi, congress accuses Mamata Banerjee of dictatorial mentality

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) मृत झाली असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अनेकदा विदेशात जात असल्यामुळे ते भाजपशी लढत नाहीत, अशी टीका केली होती. ममतांची टीका कॉँग्रेसला चांगलीच झोंबली आहे.



    बॅनर्जी यांची मानसिकता ही हुकुमशाहीची आणि भाजपशी युती असल्याची टीका करत कॉँग्रेसचे प्रवक्ते खासदार रणदीप सुरजेवाला म्हणाले, राजकीय संधी साधणे आणि वैचारिक संघर्ष यात फरक आहे. तुम्ही राजकीय पक्षांची देवाणघेवाण करणार आणि आम्हाला राजकारणाबद्दल सांगता?

    याच ममता बॅनर्जी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) होत्या. २००१नंतर बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत होते. २००३मध्ये त्यांनी काँग्रेसशी संघर्ष केला. त्यावेळी ते म्हणाले होते की, भाजप हा माझा नैसर्गिक मित्र आहे.

    २००४मध्ये प्रशांत किशोर पुन्हा भाजपशी लढले. २००९मध्ये बॅनर्जी युपीएमध्ये आल्या. ममता बॅनर्जी या २०१२मध्ये युपीएतून बाहेर पडल्या. युपीएवर बोलणाऱ्या त्या कोण? राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच वैचारिक लढत देत आहेत असे नाही तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही देत आहेत.

    After criticism on Rahul Gandhi, congress accuses Mamata Banerjee of dictatorial mentality

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची