विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारताच्या सीमेवर चीनने गाव वसविल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. मात्र, हा प्रकार १९५९ मध्येच घडला आहे. त्यामुळे आता याबाबत काहीही करता येणार नाही, असे संरक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.According to the Department of Defense, China’s occupation of village on the Indian border was captured during the Congress period, in 1959.
तत्कलिन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हिंदी-चीनी भाई भाई या घोषणेच्या काळातच १९५९ मध्ये चीनने भारतीय चौकीवर हल्ला केला होता. त्यावेळी वादग्रस्त भागात गाव वसविले होते, असे संरक्षण विभागाने म्हटले आहे. त्यानंतर १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला. भारतीय सीमा ओलांडून चीनचे सैन्य पुढे आले. त्यानंतर चीननेच एकतर्फी युध्दबंदी केली आणि भारताचा मोठा भाग गिळंकृत केला.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अलीकडेच एक रिपोर्ट दिला असून, यानुसार, चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश या दरम्यान असलेल्या वादग्रस्त भागावर चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टसंदर्भात भारतीय संरक्षण विभागाने उत्तर दिले आहे.
एका भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशचे वरच्या भागात सीमेजवळ असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त भागात चीनने १९५९ मध्येच कब्जा केला आहे. या ठिकाणी १०० घरांचे एक गावच वसवले गेले आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील हा भाग भारताचा अधिकार असल्याचा दावा आम्ही आधीपासून करत आहोत.
मात्र, या भागावर चीनने कब्जा केला आहे. आता यावर काही करता येऊ शकत नाही, असे संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. याभागात अचानक काही झालेले नाहीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील सीमान्त भागात १९५९ मध्ये एका ऑपरेशन अंतर्गत आसाम रायफल्सच्या एका चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला होता.
यानंतर या भागात चीनने गाव वसवण्यास सुरुवात केली. या भागात चिनी सैन्याची एक चौकीही आहे. या भागात अचानक काही झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेने केलेला दावा चीनने फेटाळून लावला आहे. चीनने सॅटेलाइट चित्रे जारी करून त्या भागात काही बांधकाम करण्यात आलेले नाही, हे सांगितले आहे. दुसरीकडे, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३ हजार ४८८ किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जियाओकांग मॉडेल सीमा भागातील संरक्षण गावे वसवत आहे.
According to the Department of Defense, China’s occupation of village on the Indian border was captured during the Congress period, in 1959.
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल